Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवापूर येथील जुना सरकारी दवाखाच्या जागेवर नियोजीत कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाचे बांधकाम करावे : माजी जि.प.अध्यक्ष भरत गावीत यांची मागणी

Mahesh Patil by Mahesh Patil
June 25, 2021
in शैक्षणिक
0
नवापूर येथील जुना सरकारी दवाखाच्या जागेवर नियोजीत कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाचे बांधकाम करावे : माजी जि.प.अध्यक्ष भरत गावीत यांची मागणी

नंदुरबार | प्रतिनिधी-
नवापूर येथील जुना सरकारी दवाखाच्या जागेवर नियोजीत कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाचे बांधकाम करावे या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांना माजी जि.प.अध्यक्ष तथा भाजपाचे नवापूर तालुका अध्यक्ष भरत गावीत यांनी दिले.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सन-२०११-१२ या आर्थिक वर्षात नंदुरबार सारख्या १०० टक्के आदिवासी उपयोजना क्षेत्रातील जिल्हयाकरीता मुलींच्या शिक्षणाची प्राथमिकता लक्षात घेऊन शिक्षणापासुन पुर्णपणे वंचित राहिलेल्या तसेच शाळा अर्धवट सोडुन निरक्षरतेच्या दिशेन वाटचाल करणार्‍या मुलींकरीता शासनाने नंदुरबार जिल्यातील ६ तालुक्यासाठी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालये सुरु केलीत. त्यापैकी नवापूर वगळता उर्वरीत ५ तालुक्याच्या मुख्यालयी स्वतःच्या मालकीच्या जागेत शालेय इमारतीत विद्यालये सुरु आहेत. परंतु नवापूर येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय ३ कि.मी. लांब अंतर असलेल्या वाकीपाडा ता. नवापूर येथे भाडयाच्या इमारतीत सुरु आहे हि दुर्दैवाची बाब आहे.
सुरवातीस नवापूर कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय शालेय इमारत बांधकामासाठी निंबोणी ता. नवापूर जि. नंदुरबार येथे जवळपास ३५ कि.मी. लांब अंतरावर मंजुरी देण्यात आली होती.परंतु त्यावेळी तात्कालीन खासदार माणिकराव  गावीत यांनी हरकत घेऊन तसेच जिल्हास्तरावर व राज्यस्तरावर सतत पाठपुरावा करुन नवापूर येथेच शालेय इमारत बांधणेसाठी प्रयत्न केला होता. त्यांचे प्रयत्न व स्वप्न पुर्ण करण्यासाठी त्यावेळी मी जिल्हा परीषदेचा अध्यक्ष असतांना संबधित विभागाच्या अधिकार्‍यांना लेखी सुचना देऊन, सर्व्हे करुन तहसिल कार्यालय, नवापूर या कार्यालयाच्या समन्वयाने जुना सरकारी दवाखाना निर्लेखित करुन कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयासाठी जागा उपलब्ध होऊ शकते याची माहिती उपलब्ध करुन सरकारी जुना दवाखान्याची जागा निश्चीत करण्यात आली . त्यानंतर अध्यक्षपदाची कार्यकीर्द पुर्ण झाल्यानंतर देखील सदर जागेवरच कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय व्हावे यासाठी सतत पाठपुरावा करीत आहे व करीतच राहणार.माझ्या या प्रयत्नास यश येऊन सन २०१७ मध्ये जुना सरकारी दवाखान्याची जागा प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या नावावर होऊन शासनाने देखील शाळेचे बांधकाम सुरु केलेले आहे .मात्र स्थानिक काही राजकीय व्यक्ती त्यांच्या स्वार्थापोटी त्या ठिकाणी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय होऊ नये म्हणुन विरोध दर्शवित आहे त्यामुळे आदिवासी व दलित , अनाथ मुली शालेय शिक्षणापासुन वंचित राहणार आहे व त्यांचे मोठया प्रमाणात शैक्षणिक नुकसान होणार आहे._ म्हणुन आपण सदर कामी जातीने लक्ष. देऊन कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाची शालेय इमारत जुना सरकारी दवाखाना या नियोजित शासकीय जागेवरच होण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली .यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारूड यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा सदस्य भारत गावीत, जि प सदस्या संगीता गावीत, अजय गावित ,प्रकाश गावीत ,धनंजय गावीत हे उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

पतीचे निधन झालेल्या महिलेला आर्थिक मदतीचा धनादेश

Next Post

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामासाठी ५३२ कोटीच्या अंदाजपत्रकाला मंजुरी

Next Post
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामासाठी ५३२ कोटीच्या अंदाजपत्रकाला मंजुरी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामासाठी ५३२ कोटीच्या अंदाजपत्रकाला मंजुरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सावधान : गोमाई नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

सावधान : गोमाई नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

September 24, 2023
पर्यटनस्थळाची श्रमदानातून स्वच्छता , गट विकास अधिकारी यांच्या हस्ते गौरव

पर्यटनस्थळाची श्रमदानातून स्वच्छता , गट विकास अधिकारी यांच्या हस्ते गौरव

September 24, 2023
औरंगाबाद खंडपीठाचे पत्नी व मुलांना वाढीव पोटगी देण्याचे आदेश

औरंगाबाद खंडपीठाचे पत्नी व मुलांना वाढीव पोटगी देण्याचे आदेश

September 24, 2023
सहाय्यक सरकारी अभियोक्ता पदी निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या विधी महाविद्यालयातर्फे सत्कार

सहाय्यक सरकारी अभियोक्ता पदी निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या विधी महाविद्यालयातर्फे सत्कार

September 24, 2023
राम रहीम उत्सव समिती तर्फे गणेश विसर्जन मुख्य मिरवणुकीत सहभागी मंडळ पदाधिकाऱ्यांच्या उद्या सत्कार

विविध रस्त्यांचे कामे त्वरित सुरू करा, मा.आ.चंद्रकांत रघुवंशी यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कडे मागणी

September 24, 2023
नवोदित आणि अनुभवी डॉक्टरांनी आदिवासी भागात सेवा द्यावी : डॉ. विजयकुमार गावित

नवोदित आणि अनुभवी डॉक्टरांनी आदिवासी भागात सेवा द्यावी : डॉ. विजयकुमार गावित

September 24, 2023

Total Views

  • 3,588,270 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group