Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

चिनोदा येथे तरुण युवकांतर्फे दिवाळी फराळ वाटप

team by team
October 26, 2022
in सामाजिक
0
चिनोदा येथे तरुण युवकांतर्फे दिवाळी फराळ वाटप
चिनोदा.ता.तळोदा  |  वार्ताहर
 तळोदा तालुक्यातील चिनोदा येथे तरुण युवकांतर्फे दिवाळी सणाचे औचित्य साधून आपुलकीच्या भावनेतून गरजू व गोरगरिबांना दिवाळी निमित्ताने दोनशे फराळ किटचे वाटप करून दिवाळी साजरी करण्यात आली.
       सर्वत्र साजरा होणारा सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी होय. दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव. हा सण अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतिक आहे. दिवाळी हा सण खूप उत्साहात साजरा केला जातो. घराघरात आनंदाने आणि आपापल्या परिस्थितीनुसार नवीन कपडे, दागिने, फराळ या गोष्टींबरोबर हा सण साजरा करतात. मात्र काही कुटुंब अशी आहेत की ते केवळ आर्थिक परिस्थितीमुळे सण साजरा करू शकत नाहीत. मात्र त्यांनाही दिवाळीचा आनंद घेता यावा त्यांचीही दिवाळी गोड व्हावी यासाठी चिनोदा येथील तरुण युवक कपिल मराठे, अमृत मराठे, भूषण मराठे या युवकांनी स्तुत्य उपक्रम राबवित चिनोदा येथे दिवाळीनिमित फराळ वाटपासाठी हे तरूण युवक पुढे सरसावले व गरजू व गोरगरिबांना दिवाळी फराळ किटचे वाटप करण्यात आले. यावेळी चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहून हृदयापासून आम्हांलाही खूप आनंद असून या उपक्रमातून त्यांचीही दिवाळी आनंदमय झाली.
      दिवाळीचा सण हा आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने दिवाळी साजरा होत नाही. त्यांच्या घरातही दिवाळी साजरी झाली पाहिजे त्यांच्या चेहऱ्यावर देखील आनंद दिसला पाहिजे या उदात्त हेतूने चिनोदा येथील तरुण युवकांनी या दिवाळीला फराळ वाटपाचा उपक्रम राबवित दिवाळीच्या सणात त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे असे या तरुण युवकांनी सांगितले.  यावेळी चिनोदा येथील तरुण युवक कपिल मराठे, अमृत मराठे, भूषण मराठे, अमरसिंग वसावे आदी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

जि.प.अध्यक्ष निवडीप्रसंगी भाजपाला समर्थन ही राष्ट्रवादीची भुमिका नाही,जिल्हा उपाध्यक्ष पदावरुन मोहन शेवाळे यांना हटविले : डॉ.अभिजीत मोरे

Next Post

नक्षत्र छंद मंडळाच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी अनुभवले सूर्यग्रहण

Next Post
नक्षत्र छंद मंडळाच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी अनुभवले सूर्यग्रहण

नक्षत्र छंद मंडळाच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी अनुभवले सूर्यग्रहण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add