Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जि.प.अध्यक्ष निवडीप्रसंगी भाजपाला समर्थन ही राष्ट्रवादीची भुमिका नाही,जिल्हा उपाध्यक्ष पदावरुन मोहन शेवाळे यांना हटविले : डॉ.अभिजीत मोरे

team by team
October 26, 2022
in राजकीय
0
जि.प.अध्यक्ष निवडीप्रसंगी भाजपाला समर्थन ही राष्ट्रवादीची भुमिका नाही,जिल्हा उपाध्यक्ष पदावरुन मोहन शेवाळे यांना हटविले : डॉ.अभिजीत मोरे
नंदूरबार l प्रतिनिधी
जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत  राष्ट्रवादीच्या चार सदस्यांनी  घेतलेली भुमिका ही पक्षाची भुमिका नसून  त्यांनी व्यक्तीगतरित्या भाजपाला समर्थन  दिले. मात्र, पक्षविरोधी काम  केल्याने मोहन शेवाळे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष पदावरुन हटविण्यात आले असून त्यांच्यासह अन्य चारही जि.प.सदस्यांवर पक्षाच्या शिस्तपालन समितीकडे तक्रार करण्यात आली आहे, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे  यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, निवडीप्रसंगी कॉंग्रेसकडून आम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न झाल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.
नंदुरबार जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीच्या जि.प.सदस्यांच्या समर्थनानंतर भाजपाने सत्ता स्थापन केल्यानंतर याबाबत खुलासा करण्यासाठी जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी डॉ.मोरे म्हणाले, भाजपाने कॉँग्रेसच्या काही सदस्य व राष्ट्रवादीच्या ४ जि.प.सदस्यांच्या समर्थनानंतर सत्ता स्थापन केली आहे. मात्र यास राष्ट्रवादी पक्षाचा पाठींबा नसून याउलट या घटनेचा निषेध करत आहोत.
सन २०१९ मध्ये झालेल्या जि.प.निवडणूकीप्रसंगी जागा वाटपाबाबत समझोता झाला होता व त्यावेळी आपण जिल्हाध्यक्ष देखील नव्हतो. मात्र त्यानंतर झालेल्या पोटनिवडणूकीत महाविकास आघाडीसोबत राहणे आम्ही पसंत केले होते. नवापूर तालुक्यातील चितवी गटातून सुनिल गावित तर शहादा तालुक्यातील पाडळदा गटातून मोहन शेवाळे विजयी झाले होते. यामुळे त्यांनी महाविकास आघाडीसोबत राहणे अपेक्षित होते. मात्र स्थानिक पातळीवर पक्ष म्हणून आघाडीचा धर्म पाळला गेला नसल्याने याचा निषेध करीत आहोत. भाजप व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांची विचारधारा वेगवेगळी असून चौघा सदस्यांनी भाजपाला समर्थन दिल्याने याबाबत प्रदेश पातळीवर तक्रार दिली असल्याचे डॉ.मोरे यांनी सांगितले.
राष्ट्रवादी नेहमी महाविकास आघाडीसोबतच राहणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले. शिस्त पालन समितीकडे चौघा सदस्यांबाबत अहवाल पाठविला असून प्रदेश पातळीवरुन निर्णय घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, आगामी पालिका निवडणूका समविचारी पक्षासोबत किंवा स्वबळावर लढविण्याची देखील तयारी असल्याचे डॉ.अभिजित मोरे यांनी स्पष्ट केले.
जि.प.अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणूकीदरम्यान, मोहन शेवाळे यांच्यावर राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी असतांना त्यांनी भाजपाला समर्थन दिले. यामुळे त्यांना पदमुक्त केले असून याबाबत वरिष्ठ पातळीवर कळविण्यात आले असल्याचे डॉ.मोरे यांनी यावेळी सांगितले.
बातमी शेअर करा
Previous Post

नक्षलवाद संपवण्यासाठी पोलीस दल सक्षम : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

चिनोदा येथे तरुण युवकांतर्फे दिवाळी फराळ वाटप

Next Post
चिनोदा येथे तरुण युवकांतर्फे दिवाळी फराळ वाटप

चिनोदा येथे तरुण युवकांतर्फे दिवाळी फराळ वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add