नंदुरबार l
तालुक्यातील वाघोदा शिवारात पुतणीला मारहाण केल्याप्रकरणी घरात घुसून दमदाटी करीत मारहाण केल्याप्रकरणी १० ते १२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार तालुक्यातील वाघोदा शिवारातील पुष्पाबाई रविंद्र पवार यांचा मुलगा आकाश याने संतोष अहिरे यांच्या पुतणीला मारहाण केली. या कारणावरुन पुष्पाबाई पवार यांच्या घरासमोर संतोष अहिरे, लोटन अहिरेचा मोठा मुलगा यांच्यासह १० ते १२ जणांनी आकाश याला घराबाहेर बोलावून हाताबुक्यांनी मारहाण केली.
तसेच घरात घुसून एलईडी व खिडकीच्या काचा फोडून नुकसान केले. तसेच पुष्पाबाई पवार व त्यांची मुलगी रश्मी रविंद्र पवार तसेच वहिणी कल्पनाबाई हादवे व त्यांची मुलगी गिता यांनाही मारहाण केली. याबाबत पुष्पाबाई पवार यांच्या फिर्यादीवरुन उपनगर पोलिस ठाण्यात १० ते १२ जणांविरोधात भादंवि कलम १४३, १४७, ४२७, ४५२, ३२३, ३३७, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक देविदास सोनवणे करीत आहेत.








