नंदुरबार l
बाल न्याय मंडळाचे कार्यालय प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने आज पासून नवीन जागेवर स्थलांतरीत झाले आहे. तरी जिल्ह्यातील सर्व नागरीक, पोलीस विभाग, वकील महासंघ, वकील संघटना, पक्षकार, महिला व बाल विकास विभागांतर्गत कार्यरत स्वयंसेवी संस्था, बालकांच्या क्षेत्रात कार्यरत संस्था, समाज कार्यकर्ते, विधी संघर्ष बालके व त्यांच्या पालकांनी खालील नवीन पत्त्यावर संपर्क साधावा.असे आवाहन जिल्हा माहिला व बाल विकास अधिकारी रा.वा.बिरारी यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.
कार्यालयाचा नवीन पत्ता असा : अध्यक्ष / सदस्य, बाल न्याय मंडळ, महिला आर्थिक विकास महामंडळ, यांचे प्रशिक्षण केंद्र, जिल्हा परिषद शेजारी,टोकर तलाव रोड, नंदुरबार








