शहादा l प्रतिनिधी
येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात अर्थ, वाणिज्य व नियोजन मंडळाचे उद्घाटन महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाचे सौरभ जहागिरदार यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. पाटील होते.
श्री.जहागिरदार यांनी आपल्या भाषणात “आर्थिक साक्षरता आणि आजचा तरुण” या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ.आर.एस.पाटील यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना आर्थिक साक्षरतेचे महत्व विषद केले.अर्थ, वाणिज्य आणि नियोजन मंडळाचे संयोजक डॉ.डी.एम्.गांगुर्डे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय करून दिला.प्रा.एस. एस.पवार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.प्रा. कौस्तुभ जहागिरदार यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. जगदीश पाटील, प्रा.जी.एस.गवई,प्रा. प्रदीप निकुंभे, प्रा.मालसिंग वसावे, प्रा.मोनिका पटेल यांनी परिश्रम घेतले.








