नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष पदासाठी काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज भाजपातर्फे खरेदी करण्यात आल्याने जिल्हा परिषदेत संतांतर होण्याची दाट शक्यता वाटत आहे.
नंदूरबार येथील जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी भाजपाकडून सुप्रिया गावित,डॉ.कुमुदिनी गावित, राजश्री गावित यांनी तर काँग्रेसकडून ॲड. सीमा वळवी, गीता पाडवी यांनी अर्ज खरेदी केले आहेत तर जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदासाठी बाळासाहेबांची शिवसेनेकडून ॲड.राम रघुवंशी, विजय पराडके यांनी उमेदवारी दाखल केली आहे.
दरम्यान, भाजपकडून उपाध्यक्ष पदासाठी काँग्रसचे सुहास नाईक यांच्या अर्ज खरेदी करण्यात आला असल्याने जिल्हा परिषदेवर सत्तंतराची दाट शक्यता आहे.
जिल्हा परिषदेत सद्यस्थितीत काँग्रेसचे 24 भाजपाचे 20 राष्ट्रवादीचे चार बाळासाहेबांची शिवसेनेचे सहा तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दोन असे पक्षीय बलाबल आहे.








