नंदुरबार l
राष्ट्रीय ओबीसी महासंघाची नंदुरबार जिल्हा कार्यकारिणी गठीत करण्यात आली आहे. त्यात नंदुरबार युवक जिल्हाध्यक्षपदी प्रशांत रामभाऊ माळी, युवक जिल्हा उपाध्यक्षपदी साजन मनोहर साठे तर महिला जिल्हाध्यक्षपदी सौ.प्रतिभा भरत चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.बबनराव तायवाडे यांच्या आदेशान्वये राष्ट्रीय युवक अध्यक्ष सुभाष घाटे, महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा कल्पनाबाई मानकर यांनी उत्तर महाराष्ट्र विभागीय महासंघाकडून राष्ट्रीय ओबीसी महासंघाची नंदुरबार जिल्हा कार्यकारिणी गठीत करण्यात आली आहे.
सामाजिक कार्याची दखल घेवुन उत्तर महाराष्ट्र विभाग राष्ट्रीय ओबीसी युवक महासंघाच्या नंदुरबार जिल्हा युवक अध्यक्षपदी प्रशांत रामभाऊ माळी, युवक जिल्हा उपाध्यक्षपदी साजन मनोहर साठे आणि महिला जिल्हाध्यक्षपदी सौ.प्रतिभा भरत चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. युवकच्या नवनियुक्त पदाधिकार्यांना उत्तर महाराष्ट्र विभागीय युवक अध्यक्ष भटु नेरकर व महिला पदाधिकार्यास प्रदेश महिलाध्यक्षा कल्पनाबाई मानकर यांनी नियुक्तीपत्र दिले आहे.
राष्ट्रीय ओबीसी महासंघामार्फत होणार्या स्थानिक, राज्यस्तरीय व राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये सक्रीय सहभागी होवुन महासंघांचे कार्य करावे. तसेच संघटनेची भुमिका व कार्यासाठी नेहमी तत्पर रहावे, असे नंदुरबार जिल्ह्यातील नवनियुक्त पदाधिकार्यांना दिलेल्या नियुक्तीपत्रातून कळविण्यात आले आहे.








