नंदुरबार l प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील १५० बसेस व ५० लहान मोठ्या अशा २०० वाहनांमधून हजारो कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत. मंगळवारी सायंकाळी शिवसेनेचे नेते, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी बसला झेंडा दाखवला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर आज दसऱ्यानिमित्त मुंबई येथे बीकेसीमध्ये दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. या मेळाव्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रात्री उशिरा रवाना झाले. शिवसेना नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर यांच्या हा पहिलाच मेळावा असल्यामुळे शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साह संचारलेला आहे.
याप्रसंगी उपस्थित शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन बी.के पाटील, प्रभारी नगराध्यक्ष कुणाल वसावे, शिवसेना तालुकाप्रमुख रवींद्र गिरासे, पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील नगरसेवक परवेज खान,शेतकरी सहकारी संघाचे संचालक भाऊसाहेब शिंत्रे, जि.प सदस्य प्रतिनिधी डॉ. सयाजीराव मोरे, जि.प माजी सभापती विक्रमसिंग वळवी, ज्येष्ठ शिवसैनिक ताराचंद माळसे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रोहिदास राठोड यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








