Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बँक ऑफ महाराष्ट्र कडून महिला सक्षमीकरणासाठी स्वयं सहायता समूहांना २ कोटी १७ लाखांचे अर्थसहाय्य

team by team
September 26, 2022
in राज्य
0
बँक ऑफ महाराष्ट्र कडून महिला सक्षमीकरणासाठी स्वयं सहायता समूहांना २ कोटी १७ लाखांचे अर्थसहाय्य
नंदूरबार l प्रतिनिधी –
  अक्कलकुवा तालुक्यातील उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवानोन्नती अभियानातील स्वयं सहायता समूहांना आर्थिक पाठबळ मिळावे व या आर्थिक मदतीतून उपजीविका आधारीत उपक्रम सुरु करून रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबविन्यासाठी तालुका अभियान व्यवस्थापन कक्षामार्फत सातत्याने पाठपुरावा केला जात होता. त्याला बँक ऑफ महाराष्ट्र बँकेने दुजोरा दिला. अखेर खापर येथे दिव्यमणी इंग्लिश मिडीयम शाळेत बँक ऑफ महाराष्ट्र व उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अक्कलकुवा यांच्या संयुक्त विद्यमानाने बँक मेळावा संपन्न झाला.
बँक मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक ए.बी.विजयकुमार, जळगाव विभागीय क्षेत्रीय व्यवस्थापक  रश्मी रेखापती, सहाय्यक क्षेत्रीय व्यवस्थापक  नितीनकुमार पिंपळे, विभागीय अधिकारी  विजय जाधव, स्वप्नील चोपडे, गोपाळ फंड, प्रणीत मित्तल, एलडीएम जयंत देशपांडे, नाबार्डचे डीडीएम प्रमोद पाटील, जिल्हा व्यवस्थापक आर्थिक समावेशन उमेश अहिरराव, तालुका अभियान व्यवस्थापक मिनाक्षी वळवी आदी मान्यवर उपस्थित होते.
बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक ए.बी.विजयकुमार यांनी उपस्थित महिलांना उमेदने दिलेल्या दशसुत्रीचा अवलंब केल्यास त्यांची परिस्थिती निश्चितच सुधारेल, जसे कर्ज घेतात त्याचप्रमाणे परतफेड  देखील करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. आलेल्या सर्वच मान्यवरांनी मान्यवरांनी उपस्थित महिलांना आर्थिक समावेशन बाबत मार्गदर्शन केले. या मेळाव्यात अक्कलकुवा तालुक्यातील १६३ हून अधिक महीला स्वयं सहायता समूहांना २ कोटी १७ लक्ष रुपयांचे बँक कर्ज मंजूर करण्यात आले.
बँक मेळाव्याला ६०० पेक्षा अधिक  महिला उपस्थित होत्या. मेळाव्यात समूहातील महिलांनी उत्पादीत केलेल्या वस्तुंचे विक्री स्टॉल देखील लावले होते. स्टॉलवरील वस्तूंची खरेदी मान्यवरांनी मोठ्या  प्रमाणात केल्यामुळे महिलांचे मनोबल उंचावले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मृती डोंगरे यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार नितीन पिंपळे यांनी मानले.
मेळावा आयोजनासाठी प्रकल्प संचालक राजेंद्र पाटील व जिल्हा अभियान व्यवस्थापक यशवंत ठाकूर यांनी मार्गदर्शन केले. मेळावा यशस्वी करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र अक्कलकुवा, कोराई व मोलगी शाखा अधिकारी व कर्मचारी तसेच तालुका अभियान व्यवस्थापन कक्षातील तालुका अभियान व्यवस्थापक  मिनाक्षी वळवी, तालुका व्यवस्थापक  निलेश वसावे, पिंकी वळवी, किशोर पवार, तसेच प्रभाग समन्वयक तुषार वळवी, अरविंद बागले, राकेश वसावे, संभाजी पावरा, योगेश जाधव,  निखील शिर्के, राजेश राठोड, बलराम झांजरे आदींनी परिश्रम घेतले
बातमी शेअर करा
Previous Post

रियल हिरो पुरस्काराने जिल्ह्यातील 5 सर्पमित्रांचा गौरव, सागर निकुंभे यांना सर्प अभ्यासक म्हणून विशेष पुरस्कार 

Next Post

राष्ट्रीय सेवा योजना वर्धापन दिनानिमित्त विद्यापीठ स्तरीय घोषवाक्य स्पर्धा उत्साहात

Next Post
राष्ट्रीय सेवा योजना वर्धापन दिनानिमित्त विद्यापीठ स्तरीय घोषवाक्य स्पर्धा उत्साहात

राष्ट्रीय सेवा योजना वर्धापन दिनानिमित्त विद्यापीठ स्तरीय घोषवाक्य स्पर्धा उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यातील ५ हजार  शेतकऱ्यांना ५९ कोटींचा लाभ

नंदुरबार जिल्ह्यातील ५ हजार शेतकऱ्यांना ५९ कोटींचा लाभ

August 8, 2026
भगवान एकलव्य यांच्या पुतळ्याचे डॉ. हिना गावित यांच्या हस्ते अनावरण

भगवान एकलव्य यांच्या पुतळ्याचे डॉ. हिना गावित यांच्या हस्ते अनावरण

August 8, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

August 8, 2026
शहादा-धडगाव रस्त्यावर 59 लाखांचा अवैध गोवा मद्यसाठा जप्त;दोन बोलेरो वाहनांसह एकाला अटक

शहादा-धडगाव रस्त्यावर 59 लाखांचा अवैध गोवा मद्यसाठा जप्त;दोन बोलेरो वाहनांसह एकाला अटक

August 7, 2026
धडगाव तालुक्यातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मार्ग सुकर करा; शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके

धडगाव तालुक्यातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मार्ग सुकर करा; शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके

August 7, 2026
डॉ.सुप्रिया गावित यांची भाजपा अनुसूचित जमाती (ST) मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

डॉ.सुप्रिया गावित यांची भाजपा अनुसूचित जमाती (ST) मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

August 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add