नंदुरबार l
महाराष्ट्राच्या लाखो तरुणांना रोजगार देणारा वेदांत कंपनीच्या 1.45 लाख कोटीच्या प्रकल्प गुजरातला गेला तरी देखील महाराष्ट्र सरकारने काहीच पाठपुरावा केला नाही त्यामुळे लाखो तरुणांवर बेरोजगारीचा दगड पडणार आहे म्हणून महाराष्ट्र मधील शिंदे फडणवीस सरकारच्या विरोध व निषेध करण्यासाठी युवासेने तर्फे आज निषेध आंदोलन करण्यात आले तसेच या प्रकल्पाला महाराष्ट्रात परत आणण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली.
महाआघाडी सरकारच्या वेळेस तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व तत्कालीन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी वेदांत कंपनीच्या जवळपास 1.45 लाख कोटीच्या प्रकल्प महाराष्ट्रात राबविला होता या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील लाखाच्या वर तरुणांना रोजगार उपलब्ध होणार होता परंतु शिंदे फडणवीस सरकारने हा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला पळवला त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक तरुण बेरोजगार होतील परंतु आताचे सरकार हे खापर महाविकास आघाडी सरकारवर फोडत आहे.
यांनी जर वेळेवर पाठपुरावा केला असता तर हा प्रकल्प बाहेर गेलाच नसता. म्हणून अशा निष्क्रिय व तरुणांना बेरोजगार करणाऱ्या सरकारच्या आज युवा सेनेतर्फे जाहीर निषेध करण्यात येत आहे व सरकारने हा प्रकल्प महाराष्ट्रात पुन्हा आणावा अशी मागणी करत आहोत. यावेळी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख अर्जुन मराठे उपजिल्हाप्रमुख सागर पाटील ,शहराध्यक्ष ,दादा कोळी, मोंटी भाबड ,गिरीश मराठे,गोविंदा चौधरी, संतोष कोळी ,देवा मराठे, घारु कोळी, चेतन मराठे, आनंदा पाटील, दिनेश भोपे, व युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








