नाशिक l
राज्यात दरवर्षी शेती व पुरक क्षेत्रात अति उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यास अथवा संस्थेस पुरस्कार देवून सन्मानित केले जाते. सन 2021 वर्षासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कारासाठी व्यक्ती व संस्थांना प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन नाशिकचे विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी केले आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार हा कृषी विभागामार्फत कृषी क्षेत्रात संघटनात्मक, राज्याला दिशादर्शक व अतिउल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, गट अथवा संस्थेस देण्यात येणारा कृषी क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे. या पुरस्काराचे स्वरूप रूपये 75 हजार, स्मृतीचिन्ह व सपत्नीक/ पतीसह सत्कार असे असून राज्यातून एक असा आहे. हा पुरस्कार माननीय राज्यपालांच्या हस्ते प्रदान केला जातो.
असे आहेत पुरस्कारासाठीचे निकष
प्रस्तावासोबत सादर करावयाची आवश्यक दस्तावेज
वरीलप्रमाणे नाशिक विभागातील पात्र इच्छुक शेतकरी, गट व संस्था यांनी अधिक माहितीसाठी आपल्या तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करावा, असे विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी कळविले आहे.








