Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

डॉ.पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करावेत

team by team
September 12, 2022
in राज्य
0
डॉ.पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करावेत
नाशिक   l
राज्यात दरवर्षी शेती व पुरक क्षेत्रात अति उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यास अथवा संस्थेस पुरस्कार देवून सन्मानित केले जाते. सन 2021 वर्षासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कारासाठी व्यक्ती व संस्थांना प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन नाशिकचे विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी केले आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार हा कृषी विभागामार्फत कृषी क्षेत्रात संघटनात्मक, राज्याला दिशादर्शक व अतिउल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, गट अथवा संस्थेस देण्यात येणारा कृषी क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे. या पुरस्काराचे स्वरूप रूपये 75 हजार, स्मृतीचिन्ह व सपत्नीक/ पतीसह सत्कार असे असून राज्यातून एक असा आहे. हा पुरस्कार माननीय राज्यपालांच्या हस्ते प्रदान केला जातो.
असे आहेत पुरस्कारासाठीचे निकष
▪️ प्रस्तावित शेतकरी, गट व संस्था यांना केंद्र किंवा राज्य शासनाचा कोणताही पुरस्कार प्राप्त झालेला असावा. शेतकऱ्याची स्वत:च्या नावावर शेती असावी आणि कुटुंबीयांसह त्याचा शेती हा प्रमुख व्यवसाय असावा
▪️ प्रस्तावित शेतकरी यशस्वी उत्पादन, रोपवाटिका, सेंद्रिय शेती निविष्ठा उत्पादन व वापर, काढणी पश्चात व्यवस्थापन, साठवणूक व मूल्यवर्धन कृषी प्रक्रिया, निर्यात इत्यादी कार्यात सहभागी होवून परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारा असावा.
▪️ शासनाच्या कृषी विभागाकडून दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय दोन पुरस्कारांमधील अंतर किमान पाच वर्ष असावे.
▪️ संबंधित शेतकरी केंद्र राज्य शासकीय, निमशासकीय किंवा शासन अंगीकृत संस्थेमध्ये नोकरी करत नसावा किंवा सेवानिवृत्ती वेतन किंवा कोणत्याही प्रकारचे नियमित मानधन घेणारा नसावा.
प्रस्तावासोबत सादर करावयाची आवश्यक दस्तावेज
▪️ 7/12 व 8-अ चा उतारा
▪️ केंद्र राज्य शासकीय निमशासकीय किंवा शासन अंगीकृत संस्थेमध्ये नोकरी करत नसल्याबाबतचे स्वंयघोषणापत्र
▪️ मूळ प्रतीतील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाचा चारित्र्याचा दाखला
▪️संबंधित शेतकरी / संस्थेला मिळालेले पुरस्कार व कृषी विषयक कार्य दर्शविणारे प्रमाणपत्रे इत्यादी.
वरीलप्रमाणे नाशिक विभागातील पात्र इच्छुक शेतकरी, गट व संस्था यांनी अधिक माहितीसाठी आपल्या तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करावा, असे विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी कळविले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

प्राण्यांमधील संक्रमक व सांसर्गिक रोगाची माहिती पशुसंवर्धन विभागास देणे बंधनकारक

Next Post

नाफेडमार्फत धान्य खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी अर्ज सादर करा

Next Post
नाफेडमार्फत धान्य खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी अर्ज सादर करा

नाफेडमार्फत धान्य खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी अर्ज सादर करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add