Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नाफेडमार्फत धान्य खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी अर्ज सादर करा

team by team
September 12, 2022
in राज्य
0
नाफेडमार्फत धान्य खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी अर्ज सादर करा
नंदुरबार   l
खरीप हंगाम 2022-2023 मध्ये धुळे व नंदुरबार जिल्ह्यात नाफेडमार्फत केंद्र शासनाची कडधान्य, मुग, उडीद व सोयाबीन खरेदी केंद्र सुरु करण्याचे नियोजन असल्याने त्यासाठी अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी एस.बी.सोनवणे यांनी केले आहे.
खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी जिल्हा, तालुकास्तरावरील ‘अ’ वर्ग सभासद असलेली खरेदी विक्री संघ, पणन व प्रक्रिया सहकारी ‘अ’ वर्ग सभासद संस्था, ज्या ठिकाणी दोन्ही ‘अ’ वर्ग सभासद संस्था कार्यरत नसतील त्याठिकाणी इतर सहकारी संस्थेस ‘ब’ वर्ग सभासद करुन घेवून खरेदीचे काम देण्यात येईल.
मात्र सदरची संस्थेची नोंदणी किमान दोन वर्षांपूर्वी झालेली असावी. ज्या ठिकाणी ‘अ’ वर्ग व ‘ब’ वर्ग सहकारी संस्था खरेदी करण्यात तयार नसेल त्या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती, खाजगी बाजार समिती, एफपीओ राहील.
खरेदी केंद्र सुरु करणाऱ्या संस्थेकडे मॉईश्चर मिटर, चाळणी, ताडपत्री, संगणक, संगणक यंत्रणा चालविण्यासाठी जनरेटर, स्कॅनर असलेला स्मार्ट फोन, संगणक हाताळण्याकरीता प्रशिक्षीत असलेला सेवक वर्ग, इलेक्ट्रॉनिक वजन काटा इत्यादी साधनसामुग्री व मनुष्यबळ उपलब्ध असल्याचा सहायक निबंधक सहकारी संस्थेचा दाखला तसेच शेतकरी उत्पादक संस्था असल्याचा प्रकल्प संचालक (आत्मा ) कार्यालयाचा दाखला आवश्यक असेल.
तसेच वखार महामंडळाच्या गोदामात साठवणुकीपूर्वी संस्थेचे स्वत:चे, भाड्याचे गोदाम असावे. अन्नधान्य, कडधान्य व तेलबिया इत्यादी खरेदी विक्रीचा किमान एक वर्षांचा अनुभव असावा. खरेदी केंद्र चालविण्यासाठी आवश्यक सेवक उपलब्ध असावे, काळया यादीत, अपहार, फौजदारी गुन्हे याबाबत कार्यवाही झालेली नसावी. या वरीलबाबींचे सहायक निबंधक यांचे प्रमाणपत्र घेण्यात यावेत तसेच एफपीओ करीता प्रकल्प संचालक (आत्मा) कार्यालयाचे प्रमाणपत्र घ्यावेत.
संस्थेने मागील दोन वर्षांचे सनदी लेखापाल, शासकीय लेखापरीक्षक यांनी साक्षांकीत केलेली ताळेबंद पत्रके, पॅनकार्ड, जीएसटी नोंदणी प्रमाणपत्र, संस्थेकडे 5 लाख खेळते भांडवल असल्याचे बॅक प्रमाणपत्र, बॅक पासबुक नोंद. ‘ब’ वर्ग व एफपीओ संस्थाकडून 5 लाख अनामन रक्कम जमा करणे बंधनकारक राहील.आधारभूत किंमत खरेदी योजनेसाठी नाफेडने निश्चित केलेले स्टॅण्डर्ड ऑपरेटींग प्रोसिजर मान्य असल्याबाबतचे प्रतिज्ञा पत्र, संस्थेकडून खरेदी, नोंदणी मध्ये गैरव्यवहार, अनियमिता झाल्यास प्रशासकीय खर्च देय असणार नसल्याचे संमतीपत्र इत्यादी कागदपत्रे द्यावीत. खरेदी केंद्र इच्छुक खरेदी संस्थेने 16 सप्टेंबर 2022 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत कार्यालयास संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी नंदुरबार यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

डॉ.पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करावेत

Next Post

जिल्ह्यात १५ सप्टेबर पासून स्वच्छता ही सेवा मोहिम 

Next Post
जिल्ह्यात १५ सप्टेबर पासून स्वच्छता ही सेवा मोहिम 

जिल्ह्यात १५ सप्टेबर पासून स्वच्छता ही सेवा मोहिम 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add