Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Mahesh Patil by Mahesh Patil
August 24, 2021
in शैक्षणिक
0
नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा मुख्यालय ठिकाणी आणि तालुकास्तरावरील असलेल्या न्यायालयात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयात सरकारपक्षातर्फे केसेस चालविण्याकरिता मानधन तत्वावर अभियोक्ता यांची नामिका (पॅनल) तयार करण्यासाठी दि. 7 सप्टेंबर 2021 पर्यंत अर्ज करावयाचे आहेत.
  विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता पदासाठी अर्जदार भारताचा नागरीक असावा. अर्जदार मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या विधी पदवीधर असावा. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांचेकडे वकील म्हणून नोंदणी केलेली असावी. एलएलएम असल्यास प्राधान्य देण्यात येईल. जाहिरातीच्या दिनांकास अर्जदारास उच्च न्यायालय किंवा त्याहून दुय्यम न्यायालयातील किमान 5 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक राहील. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक असेल. अर्जाच्या दिनांकास खुल्या प्रवर्गातील अर्जदाराचे वय 38 आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमाल 43 वर्ष राहील. तसेच राज्य शासनाच्या गृह विभागाकडील शासन राजपत्र 8 सप्टेंबर 2015 रोजीच्या सूचनेनुसार उक्त कायद्यातील तरतूदीच्या अनुषंगाने काम करीत असलेल्या व्यक्तींना उच्च वयोमर्यादा 45 वर्ष व्यतिरिक्त अन्य कोणतीही सुट  राहणार नाही.
सदर पदे ही फौजदार प्रक्रिया संहिता कलम 25(3) अन्वये निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात मानधन तत्वावर आहेत. या निवड प्रक्रियेमार्फत निवड झालेल्या उमेदवारांना या निवडीच्या आधारावर भविष्यात स्थाई शासन सेवेत घेण्याचा अधिकार राहणार नाही व त्याबाबतचे कोणतेही विनंती अर्ज विचारात घेण्यात येणार नाही. सदर पदाची नेमणूक ही तात्पुरत्या स्वरुपाची असून विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता यापदावर नियमित नेमणूक झाल्यास किंवा काम करीत असलेले न्यायालय बंद झाल्यास त्यांची नेमणूक आपोआप रद्द करण्यात येईल.  या नियुक्त्या नियमांमधील तरतुदींच्या अधीन राहून कोणत्याही वेळी, कोणतीही पूर्वसूचना न देता संपुष्टात आणल्या जावू शकतील.
विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांना नंदुरबार शहर किंवा नंदुरबार जिल्ह्यातील तालुकाक्षेत्रातील न्यायालयात ज्या ठिकाणी नियुक्ती दिली जाईल ते ठिकाण बंधनकारक असेल. काम केलेल्या  दिवशीचे मानधन देय ठरेल. ज्या‍दिवशी काम नसेल त्या दिवशी मानधन देण्यात येणार नाही. प्रतिदिन परिणामकारक सुनावणीसाठी रुपये 600, एका जामीन अर्जांच्या विरोधाकरीता रुपये 400 तर प्रतिदिन एकूण कमाल मर्यादा रुपये 1000 इतकी असेल.
अर्जातील चुकीची माहिती किंवा कोणत्याही प्रकारची गैरवर्तणूक आढळल्यास  नियुक्ती रद्द करण्यात येईल. सदर नियुक्ती उमेदवारांच्या मुलाखती घेऊन केल्या जाणार असल्याने अर्जाच्या छाननीअंती मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यात येईल. सदर पदाची नेमणूक संचालक, अभियोग संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई आणि जिल्हाधिकारी, नंदुरबार यांच्या अधीन राहून करण्यात येईल.
पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी त्यांचे विहीत नमुन्यातील अर्ज व आवश्यक कागदपत्रे साक्षांकित प्रती जोडून आपले अर्ज 7 सप्टेंबर 2021 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत सहायक संचालक व सरकारी अभियोक्ता, 3 माधव कृपा बिल्डींग, एल.आय.सी कार्यालयासमोर माणिक नगर, ता.जि.नंदुरबार येथे दोन प्रतीत सादर करावे, असे आवाहन जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष विशेष सहायक सरकारी अभियोक्ता निवड समिती नंदुरबार मनीषा खत्री यांनी केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

जिल्ह्यात पीक कर्ज वाटप मेळाव्यांचे आयोजन

Next Post

प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामसेवकांचे आजपासुन असहकार आंदोलन

Next Post

प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामसेवकांचे आजपासुन असहकार आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त नवनिर्माण संस्थेमार्फत जनजागृती

जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त नवनिर्माण संस्थेमार्फत जनजागृती

June 2, 2025
भरडधान्य खरेदी केंद्राचे शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

भरडधान्य खरेदी केंद्राचे शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

June 2, 2025
जग स्तिमित होईल असाच कुंभमेळा होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जग स्तिमित होईल असाच कुंभमेळा होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 2, 2025
आपत्कालीन यंत्रणांनी सतर्क राहून आपली कामे करावित;कुचराई करणाऱ्या विभाग प्रमुखांवर जबाबदारी निश्चित करणार : डॉ. मित्ताली सेठी

आपत्कालीन यंत्रणांनी सतर्क राहून आपली कामे करावित;कुचराई करणाऱ्या विभाग प्रमुखांवर जबाबदारी निश्चित करणार : डॉ. मित्ताली सेठी

May 30, 2025
वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह जयंती निमित्त नंदनगरीत भव्य मिरवणूक

वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह जयंती निमित्त नंदनगरीत भव्य मिरवणूक

May 30, 2025
तोरणमाळ विकासाचा प्रस्ताव पाठवा; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

तोरणमाळ विकासाचा प्रस्ताव पाठवा; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

May 30, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group