बोरद l प्रतिनिधी
बोरद येथे श्री गणरायांचे शांततेत विसर्जन करण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हवालदार गौतम बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
दोन वर्षापासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने गणरायाची घरगुती स्थापना करण्यात आली होती. मात्र यावर्षी गावात तरुणांचे निधन झाले व कोरोनाच्या काळातही गावात मोठ्या प्रमाणात तरुणांचा मृत्यू झाल्याने मंडळात गणरायाचा स्थापनेला खंड पडू नये म्हणून अनेक गणेश मंडळांनी साध्या पद्धतीने गणरायाची स्थापना केली होती. आता अधिकृत एक व इतर एकूण लहान मोठे १३ गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली.
सालाबादाप्रमाणे पाच दिवसाची स्थापना करण्यात आली होती.आज दुपारी ठीक १२.०० वाजता मुख्य गाव गणपतीच्या मिरवणुकीस सुरुवात झाली. त्या पाठोपाठ एकामागून एक म्हणजे भट्टी अटीतील सार्वजनिक गणेश मंडळ, दत्त गणेश मंडळ, नवयुवक गणेश मंडळ, युवक गणेश मंडळ, तरुण गणेश मंडळ, भगवा गणेश मंडळ, इंदिरानगर मधील गणेश मंडळ,कलमाडी हट्टीकडील व करडे हाटीकडील गणेश मंडळ.यांची मिरवणूक बाजारपेठेत आल्यानंतर गणेश मंडळाची तेथे भेट झाली.
यावर्षी जय बजरंग गणेश मंडळाचा पाच सदस्यांचे निधन झाल्याने जागेवरच आरती करून मिरवणूक न काढता विसर्जन करण्यात आले. गावाबाहेरील बिरसा मुंडा चौकात आरती होऊन विसर्जन ४:३० वाजता करण्यात आले. काही मंडळांनी निझरी नदीवर असलेल्या धनपूर धरणावर विसर्जन केले तर काही मंडळ यांनी हातोडा येथे जाऊन तापी नदीत विसर्जन केले.
विसर्जन मिरवणूक शांततेत व्हावी यासाठी सर्व गणेश मंडळातील सदस्य, गावातील लोकप्रतिनिधी, पोलीस पाटील, तलाठी भरत बारी, ग्रामसेवक विजय पाटील, तसेच पोलीस कर्मचारी गौतम बोराडे, विजय विसावे, राजू जगताप,हेड कॉन्स्टेबल निलेश खंडे हे मिरवणुकीवर लक्ष दे ठेवून होते कोणताही अनुचित प्रकार घडला नसून शांततेत विसर्जन करण्यात आले.








