Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रनाळे येथे गोरी गणपतीची स्थापना, उद्या होणार विसर्जन

team by team
September 4, 2022
in सामाजिक
0
रनाळे येथे गोरी गणपतीची स्थापना, उद्या होणार विसर्जन
नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील रनाळे येथील बबलु कदमबाड़े यांच्या घरि गौरी ( महालक्ष्मी ) ची स्थापना करण्यात आली असून
उद्या दि.5 सप्टेंबर रोजी .गौरीचे विसर्जन होणार आहे. गौरी गणपती स्थापनामुळे नागरिकांमध्ये  उत्साह संचारला आहे.
शनिवारी गौराईंची प्रतिष्ठापना झाल्यानंतर दि. 4 रोजी विधीवत महापूजा झाली. महाभिषेकासह गौराईला महानैवेद्यही दाखवण्यात आला. दरम्यान सायंकाळी सुवासिनींना दर्शन आणि हळदीकुंकुसाठी निमंत्रण दिले जाते. उद्याच्या महापूजेनंतर उद्या दि. 5 रोजी गौराईंना दहीभाताचा नैवेद्य दाखवून निरोप दिला जाणार आहे. गौराईंचा हा सण मोठ्या भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात साजरा केला जात आहे.
गौराईंच्या सणासाठी बाहेरगावी असलेले कुटूंबातील सदस्यदेखील या दिवशी एकत्र येवून जमतात. तीन दिवस माहेराला येणार्‍या या गौराईंसाठी कुटूंबातील सर्वच सदस्यांची लगबग बघायला मिळते.
गणेशोत्सव काळात भाद्रपद महिन्याच्या सप्तमी तिथीला श्री महालक्ष्मीचे आगमन होते. खान्देशात बहुतांश ठिकाणी गौराईंचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. तीन दिवस माहेराला येणार्‍या गौराईंना दुसर्‍या दिवशी पुरणपोळी, सोळा भाज्यांचा नैवेद्य दाखविला जातो. शनिवारी सुवासिनींनी ‘आल्या आल्या गौरी, सोन्याच्या पावली म्हणून मंगलमय वातावरणात गौराईंचे थाटात स्वागत केले. गौराईंच्या सणासाठी आकर्षक अशी सजावटही केली जाते.
बातमी शेअर करा
Previous Post

खा. डॉ. हिना गावीत यांच्या हस्ते प्रहार संघटनेचे जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्कार वितरण

Next Post

बोरद येथे ५ दिवसाच्या गणेशाचे शांततेत विसर्जन

Next Post
बोरद येथे ५ दिवसाच्या गणेशाचे शांततेत विसर्जन

बोरद येथे ५ दिवसाच्या गणेशाचे शांततेत विसर्जन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

April 26, 2026
२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

April 26, 2026
शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

April 26, 2026
नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

April 26, 2026
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

April 26, 2026
जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add