तळोदा l प्रतिनिधी
राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे प्रदेश अध्यक्ष मेहबूब भाई शेख यांच्या सूचनेनूसार प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार उदेसिंग दादा पाडवी यांच्या प्रमुख उपस्थित तळोदा येथे महागाई विरोधात “50 खोके महंगाई एकदम ओके” चे टीशर्ट परिधानकरून महागाईच्या विरोधात 50 खोके महागाई एकदम ‘ ओके, जनता भरते जीएसटी , गद्दार जातात गुवाहाटी, महागाई कशासाठी, आमदारांच्या खरेदीसाठी ,महागाईने दुखते डोके , गद्दारांना 50 खोके 50 खोके,बहुत हो गयी महंगाई की मार,चलो हटाये मोदी सरकार, अश्या घोषणा देऊन निषेध करण्यात आला.
युवक तालुका अध्यक्ष कमलेश पाडवी,युवक शहर उपाध्यक्ष देवेश मगरे,शहराध्यक्ष योगेश मराठे,बांधकाम सभापती हितेंद्र क्षत्रिय,युवा नेते संदीप परदेशीं,शहर उपाध्यक्ष गणेश पाडवी,नदीम बागवान, खजिनदार धर्मराज पवार,अल्संख्यांक शहर अध्यक्ष आदिल शेख, संघटक राहुल पाडवी,सहसंघटक मुकेश पाडवी,
युवक तालुका उपाध्यक्ष दीपक वळवी,युवक तालुका उपाध्यक्ष संदीप वळवी,युवा कार्यकर्ता कुणाल पाडवी, मच्छिन्द्र पाडवी,निलेश मराठे,हितेश राणे,इमरान् शिकलीकर,नितीन मिस्त्री,असिफ शेख,हर्षल सूर्यवंशी,मन्नू मणियार,प्रकाश पाडवी,सागर पाडवी,अरुण पाडवी,हिमांशू माळी,पवन सागर,भुऱ्या चित्ते,कुशन वळवी,रमेश पाडवी,रवींद्र वळवी,विश्वनाथ वळवी युवक कार्यकर्ते उपस्थित होते.








