Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आईवडील हेच खरे जीवनातील पहिले दैवत : पंडीत अतुलशास्त्री भगरे गुरुजी

team by team
August 31, 2022
in राज्य
0
आईवडील हेच खरे जीवनातील पहिले दैवत : पंडीत अतुलशास्त्री भगरे गुरुजी

नंदुरबार  l  प्रतिनिधी-

प्रत्येकाच्या जीवनात भगवंत व संतांप्रमाणे मातृपितृचे महत्व आहे. आई ही प्रत्येकाच्या जीवनातील पहिले दैवत तर वडील हे दुसरे दैवत आहे. जीवन सुखमय करायचे असेल तर प्रत्येकाने आपल्या आई-वडीलांची सेवा करावी. भागवंताच्या पुजेप्रमाणे आईवडीलांना वंदन करुन त्यांच्या देव पाहावा. वयोवृध्द काळात आईवडीलांची सेवा केल्यास व त्यांना सर्वसुविधा दिल्यास खर्‍या अर्थाने जीवन सार्थकी लागते. म्हणून देवपूजेप्रमाणे आईवडीलांचा आदर करावा, असा भावनिक सल्ला प.पू.भागवताचार्य पंडीत अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांनी आपल्या कथा प्रवचनातून दिला.

नंदुरबार येथील नळवा रस्त्यावरी संजीवनी क्लिनीक जवळील पारेश्‍वर मेडीकल व जनरल स्टोअर्स, संजीवनी क्लिनीक यांच्या शुभारंभानिमित्त गुरुजी आयुर्वेद नाशिक यांच्यावतीने दोन दिवसीय आयोजीत मोफत्र आयुर्वेदीक आरोग्य चिकित्सा व उपचार शिबिर पार पडले. या शिबिरात अनेक नागरीकांनी नोंदणी करुन आपली आरोग्य चिकित्सा करुन घेतली. दोन दिवसीय चिकित्सा शिबिराचा समारोप काल सायंकाळी भागवताचार्य पंडीत अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांचे कथा प्रवचन झाले. यावेळी भगरे गुरुजींनी गणेशोत्सवाच्या पाश्‍वर्भमीवर बुद्धीची देवता विघ्नहर्ता गणरायाच्या विधीवत स्थापनेची माहिती दिली.

गणरायाची स्थापना ही विधीवत करुन विसर्जन देखील परंपरेनुसारच करावे, असे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, प्रत्येक मानवाच्या नजरेस मायेचा पर्दा असून भगवंत दिसत नाही. परंतू भगवंतांचा प्रभाव आपल्या त्यांच्या पूजाअर्चेतून अनुभवता येतो. प्रत्येकाने भगवंताची विधीवत पद्धतीने पूजाअर्चा करावी. जीवनात जे मिळते त्यावर समाधानी रहावे. जीवनात येणार्‍या अनेक समस्या या पितृ छायेमुळे येत असतात. कारण आपले पूर्वज असलेले पितृ हे मुक्त झालेले नसतात. म्हणून जीवनातील अनेक समस्या सुटत नाही. त्यामुळे पितृ मुक्त झाले नसल्यास ते त्रास देत नाही तर मुक्तीसाठी ते आपल्याला संदेश देतात. म्हणून जीवनात समस्या निर्माण होातात.

प्रत्येकाच्या जीवनात भगवंत व संतांप्रमाणेच पितृंचे देखील महत्वाचे स्थान आहे. त्यात विशेष करुन मातृपितृ देवभव या प्रमाणे आई ही पहिले दैवत तर वडील  दुसरे दैवत आहे. या आई-वडीलांच्या मातृपितृ छायेतून प्रत्येकाच्या जीवनात आयुष्य, ज्ञान, यश, ूळ प्राप्त होते. फळ प्राप्त होणे म्हणजे आई वडीलांच्या आशिर्वादाने पाठबळ मिळते. आपण भगवंताच्या सेवेसाठी देवपूजा करतो. परंतु प्रत्येकाने आपल्या जीवनात देवपूजेप्रमाणे आईवडीलांचा आदर करावा. आजची पिढी केवळ आपल्या गरजा पूर्ण करण्याकडे लक्ष देतात. अनेक आईवडील वृद्ध झाले म्हणून त्यांना कानाकोपर्‍यात बसवून ठेवतात म्हणूनच जीवनात अनेक समस्या निर्माण होतात.

जीवनातील समस्यांचे निवारण करायचे असेल तर आई-वडीलांची सेवा हाच खरा रामबाण उपाय आहे. आई-वडीलांना सर्व सुखसुविधा दिल्यास आपले जीवन नक्कीच सर्व सुख संपन्न सफल होईल असा मौलिक सल्ला ज्योतीषाचार्य पंडीत अतुलशास्त्री भगरे गुरुजींनी आपल्या कथा प्रवचनातून दिला. या कथेला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नंदुरबारात दोन दिवसीय आयोजीत मोफत आरोग्य आयुर्वेदीक चिकित्सा शिबिराचा समारोप कथा प्रवचनाने झाला.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्ह्यात ८९८ गणेश मंडळांची स्थापना करण्यात येणार

Next Post

शहादा तालुक्यातील ७४ ग्रामपंचायतींच्या निवडणूकीसाठी सरपंच पदासाठी १४५ तर सदस्यांसाठी ४८६ नामांकन अर्ज दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add