Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार जिल्ह्यात ८९८ गणेश मंडळांची स्थापना करण्यात येणार

team by team
August 31, 2022
in राज्य
0
नंदुरबार जिल्ह्यात ८९८ गणेश मंडळांची स्थापना करण्यात येणार

नंदुरबार  | प्रतिनिधी

नंदुरबार जिल्ह्यात यंदा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी गणेशभक्त सज्ज झाले असून त्यांची तयारीही जोमात सुरू आहे. नंदुरबार जिल्ह्यात उद्या दि. ३१ ऑगस्ट रोजी ८९८ गणेश मंडळांची स्थापना करण्यात येणार आहे. यात ३४६ खाजगी गणपती तर २७८ सार्वजनिक गणपती आहे तर ११० गावांमध्ये एक गांव गणपती संकल्पना राबविण्यात येत आहे.

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून गणेशउत्सवासाठी शासनाचे निर्बंध असल्याने गणेश भक्तांना गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करावा लागला. मात्र यंदा शासनाने कोरोनाचे सर्व निर्बंधात सुट दिल्याने यंदा गणेशोत्सवासाठी नंदुरबार जिल्हावासी सज्ज झाले आहे. गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी गणेश भक्तांची तयारीही जोमात आहे.

 

गणेश मंडळांची मंडप आरास तयार करण्याची लगभग सुरू आहे. दरम्यान  पोलीस दलाने गणेश भक्तांना सोयीचे व्हावे, यासाठी एक खिडकी योजना जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात कार्यान्वित केली आहे. त्यात गणेश मंडळांना निशुल्कपणे नोंदणी करता येणार होती. नंदुरबार जिल्ह्यात आतापर्यंत ३४६ खाजगी गणपती, सार्वजनिक गणपतीमध्ये  १४८ लहान गणपती २७८ मोठे गणपती, ११० एक गांव एक गणपतीची नोंदणी करण्यात आली आहे. उद्या दि.३१ ऑगस्ट रोजी नंदुरबार शहर अंतर्गत १२ खाजगी गणपती, ६३ सार्वजनिक मोठे गणपती असे एकूण ७५ तर नंदुरबार उपनगर खाजगी गणपती ५, सार्वजनिक लहान गणपती २२, मोठे गणपती ३०, एक गांव एक गणपती ६ एकूण ६३ नंदुरबार तालुका खाजगी गणपती ९, सार्वजनिक गणपती लहान २७,

 

 

मोठे गणपती ३९, एक गांव एक गणपती ११ एकूण ८६. नवापूर तालुका- नवापूर तालुका खाजगी ८, सार्वजनिक लहान गणपती १०, मोठे गणपती १४, एक गांव एक गणपती २५ एकूण ८०, विसरवाडी खाजगी गणपती ४०, सार्वजनिक लहान गणपती ५, मोठे गणपती १४,  एक गांव एक गणपती २५, एकूण ८४. शहादा तालुका- शहादा तालुक्यात शहादा पोलीस ठाणे अंतर्गत खाजगी गणपती २१०, सार्वजनिक लहान गणपती ४०, मोठे गणपती ३०,

 

 

एक गांव एक गणापती ३, एकूण २८३, सारंगखेडा पोलीस ठाणे अंतर्गत  खाजगी गणपती १३, सार्वजनिक लहान गणपती ५, मोठे गणपती १०, एक गांव एक गणपती ५, एकूण ३३, म्हसावद पोलीस ठाणे खाजगी गणपती २१, सार्वजनिक मोठे गणपती २३, एक गांव एक गणपती १४, एकूण ५८, धडगांव तालुका- धडगांव पोलीस ठाणे अंतर्गत खाजगी गणपती१, सार्वजनिक लहान गणपती ४, मोठे दोन, एक गांव एक गणपती ५ एकूण १२, अक्कलकुवा तालुका- अक्कलकुवा पोलीस ठाणेतर्ंगत खाजगी गणपती १३,

 

एक गांव एक गणपती १२ असे एकूण ४१, मोलगी पोलीस ठाणेतर्ंगत खाजगी गणपती ५, सार्वजनिक लहान गणपती १, मोठे गणपती २, एक गांव एक गणपती ४, एकूण १२, तळोदा तालुका- तळोदा पोलीस ठाणेतर्ंगत खाजगी गणपती ९, सार्वजनिक लहान गणपती ३४, मोठे गणपती २०, एक गांव एक गणपती ८, एकूण ७१ अशा ८९८  गणेश मंडळांची उद्या दि. ३१ ऑगस्ट रोजी स्थापना करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात ११० एक गांव एक गणपतीची स्थापना करण्यात येणार आहे. यात नंदुरबार तालुका १७, नवापूर ४२, शहादा २२, धडगांव ५, तळोदा ८ तर अक्कलकुवा तालुक्यातील १६ गावांचा समावेश आहे तर खाजगी गणपती मंडळ  नंदुरबार तालुका २६, नवापूर ४८, शहादा २४४, धडगांव १, तळोदा ९ तर अक्कलकुवा १८ सार्वजनिक गणपतीत नंदुरबार तालुका लहान ४९,  मोठे १३२, नवापूर तालुका लहान १५, मोठे ५९, शहादा तालुका लहान ४५, मोठे ६३, धडगांव तालुका लहान ४, मोठे २, तळोदा तालुका लहान ३४, मोठे २०, अक्कलकुवा तालुक्यात मोठे २ मंडळातर्फे गणपतीची स्थापना करण्यात येणार आहे.

नंदुरबार तालुक्यात एकूण २२४, नवापूर तालुक्यात १६४, शहादा तालुक्यात ३७४, धडगांव तालुक्यात १२, अक्कलकुवा तालुक्यातील ५३, तळोदा तालुक्यात ७१ गणेश मंडळातर्फे स्थापना करण्यात येणार आहे.

 

गणेश स्थापनेच्या पुर्वसंध्येला नंदुरबार शहरात गणपती घेण्यासाठी बाजाराचे स्वरूप आले होते. विविध मंडळातर्फे ट्रॅक्टर, ट्रक, छोटाहत्ती, टेम्पो, रेल्वे वाहनाने वाजत गाजत गणरायाला घेवून जाण्यासाठी लगबग दिसून आली तर अनेक कुटूंबियांनी गणपती घेण्यासाठी स्टेट बँकेजवळ असलेल्या गणपती स्टॉलवर मोठया प्रमाणात गर्दी झाली होती.

बातमी शेअर करा
Previous Post

गणेशोत्सव काळात डी . जे . व डॉल्बी सिस्टिमवर बंदी , वापर केल्यास होणार कठोर कारवाई : पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांचा इशारा

Next Post

आईवडील हेच खरे जीवनातील पहिले दैवत : पंडीत अतुलशास्त्री भगरे गुरुजी

Next Post
आईवडील हेच खरे जीवनातील पहिले दैवत : पंडीत अतुलशास्त्री भगरे गुरुजी

आईवडील हेच खरे जीवनातील पहिले दैवत : पंडीत अतुलशास्त्री भगरे गुरुजी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add