Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आयशरची कारला धडक, पिता- पुत्र जखमी,आयशर वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

team by team
August 30, 2022
in क्राईम
0
आयशरची कारला धडक, पिता- पुत्र जखमी,आयशर वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यातील पथराई फाट्याजवळ आयशरने कारला दिलेल्या धडकेत वडील व मुलगा जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी आयशर वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार शहरातील बन्सीलाल नगर येथील डॉ.सचिन रतिलाल पाटील हे त्यांच्या मालकीच्या कारने नंदुरबार येथून त्यांच्या सासरी निझर येथे परिवारासह गेले होते.
निझर येथून परिवारास सोडून डॉ.सचिन पाटील (वय ३८) व त्यांचा मुलगा विश्वम सचिन पाटील (वय ७) हे कारने (क्र.एम.एच.३९ जे ७३०७) निझरहून तळोदामार्गे नंदुरबार येथे येत होते. यावेळी वाकाचार रस्ता ते नंदुरबार रस्त्यावरील पथराई फाट्याजवळ एका आयशर वाहनावरील चालकाने त्याच्या ताब्यातील आयशर वाहन भरधाव वेगाने चालवून कारला उजव्या बाजूस जबर धडक दिल्याने अपघात घडला.
घडलेल्या अपघातात डॉ.सचिन पाटील व त्यांचा मुलगा विश्वम पाटील या दोघांनाही गंभीर दुखापत झाली आहे. तसेच दोन्ही वाहनांचेही नुकसान झाले. अपघातानंतर आयशर वाहन चालक वाहन सोडून पसार झाला.
याबाबत डॉ.सचिन पाटील यांच्या फिर्यादीवरुन उपनगर पोलिस ठाण्यात आयशर वाहन चालकाविरोधात भादंवि कलम २७९, ३३७, मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४/१८७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.पितांबर जगदाळे करीत आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नंदूरबार जिल्हा दौऱ्यानिमित्त आज महत्त्वपूर्ण बैठक

Next Post

कामचुकार कर्मचाऱ्यांवर वॉच ठेवण्यासाठी ‘हजेरी’ ॲपची निर्मिती : आदिवासी विकासमंत्री डॉ.विजयकुमार गावित

Next Post
कामचुकार कर्मचाऱ्यांवर वॉच ठेवण्यासाठी ‘हजेरी’ ॲपची निर्मिती : आदिवासी विकासमंत्री डॉ.विजयकुमार गावित

कामचुकार कर्मचाऱ्यांवर वॉच ठेवण्यासाठी 'हजेरी' ॲपची निर्मिती : आदिवासी विकासमंत्री डॉ.विजयकुमार गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add