नंदुरबार l प्रतिनिधि
जल जीवन मिशनच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व ग्रामस्थांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी जिल्हा परिषद नंदुरबार , एन . एस . ई . फाऊडेशन व सिनी टाटा ट्रस्ट यांच्या सयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या जनजागृती वाहनांचे ( आय ईसी व्हॅन ) उद्घाटन जिल्हाधिकारी मनिषा खत्री व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते करण्यात आले .
जलजीवन मिशन अंतर्गत २०२४ पर्यंत प्रत्येक कुटुंबाला दर माणसी प्रति दिवस ५५ लिटर पिण्याचे शुद्ध ,पुरेसे व नियमित पाणी मिळावे यासाठी जिल्हा परिषदेमार्फत जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या कामांना टप्या टप्याने मंजूरी देण्यात येवून कामांना सुरुवात झालेली आहे .
या पार्श्वभूमीवर जलजीवन मिशनचा उद्देश , जल जीवन मिशन योजना यशस्वी होणेसाठी गावातील पदाधिकारी व ग्रामस्थ तसेच ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा समिती यांची भूमिका व कर्तव्य , पाणी पुरवठा योजनेच्या उपगांचे गुणवत्ता निरिक्षण , योजनाची देखभाल दुरुस्ती, पाणी गुणवत्ता, सांडपाणी व्यवस्थापन, जल संवर्धन व स्त्रोत शाश्वत्ता याबाबत ग्रामस्थांमध्ये जाणीव जागृती करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभाग तसेच एन . एस . ई . फाऊडेशन अंतर्गत सिनी टाटा ट्रस्ट यांच्या संयुक विद्यमाने जनजागती मोहिम सुरु करण्यात आली आहे . सदर मोहिमेसाठी जलजीवन मिशन विषयी माहिती असणारे तीन आयईसी व्हॅन तयार करण्यात आल्या असून सदर व्हॅन या अक्कलकुवा , धडगाव व तळेदा तालुक्यासाठी राहणार आहेत.
जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय आवारात जिल्हाधिकारी मनिषा खत्री , मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी हिरवी झेंडी दाखवून या जन जागृती अभियानाची सुरुवात केली . यावेळी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय बावीस्कर , जिल्हा आरोग्य अधिकारी चौधरी सीनी टाटा ट्रस्टचे विभागीय समन्वयक साजिद मंसूरी, प्रकल्प व्यवस्थापक निशांक गजभिये, सतिश एखंडे, पुजा धुले, सत्यम ठाकुर, रोहित गुप्ता, शुभम खंदारे, सिद्धार्थ वाघ, दारासिंग पावरा, अविनाश नाईक, पवन वळवी , किशोर जाधव , जामसिंग पावरा उपस्थित होते.








