Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

विशेष गौरव पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

team by team
August 27, 2022
in राज्य
0
विशेष गौरव पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

नंदुरबार l प्रतिनिधी

विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील माजी सैनिक, युद्ध विधवा, विधवा, पत्नी, पाल्य यांना त्यांच्या कार्याबद्दल सन्मानार्थ देण्यात येणाऱ्या विशेष गौरव पुरस्कारासाठी  20 सप्टेंबर 2022 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी संजय गायकवाड यांनी केले आहे.

कल्याणकारी निधी सुधारित नियम 2001 अन्वये राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळातील पुरस्कार प्राप्त  खेळाडू, संगीत, गायन, वादन, नृत्य इ. क्षेत्रातील पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार मिळविणारे, संगणक क्षेत्रात तसेच देशात तसेच राज्यांत पूर, जळीत, दरोडा, अपघात अगर इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये तसेच देशाची  व राज्याची प्रतिष्ठा वाढवतील अशा स्वरुपाचे लक्षणीय काम करणाऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येतो.

आयआयटी, आयआयएम, एआयआयएमएस अशा नामवंत संस्थामध्ये प्रवेश मिळालेल्या माजी सैनिक व विधवा यांचे पाल्यांना आणि शैक्षणिक वर्ष 2021-2022 मध्ये  महाराष्ट्र राज्यातून दहावी व बारावी मध्ये  90 टक्क्यापेक्षा अधिक गुण मिळवुन उत्तीर्ण होणारे विद्यार्थींना दहा हजार रुपयांचा  रकमेचा पुरस्कार राज्यातून  दहावीच्या 50 तर बारावींच्या 50 पाल्यांना  देण्यात येणार आहे.

पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यापीठात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले माजी सैनिक, पत्नी, पाल्य यांना अशा कार्याबद्दल त्यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय स्तरासाठी 10 हजार  व आंतरराष्ट्रीय स्तरासाठी 25 हजार रुपयांचा  पुरस्कार देवून गौरविण्यात येते. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, माजी सैनिक विश्रामगृह आवार, संतोषी माता चौक जवळ, धुळे (दूरध्वनी क्रमांक 02562-237264) येथे संपर्क साधावा.

बातमी शेअर करा
Previous Post

एअर मार्शल व्ही.ए.पाटकर विशेष गौरव पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Next Post

जल जीवन मिशन अंतर्गत जनजागृती वाहनांचे उद्घाटन

Next Post
जल जीवन मिशन अंतर्गत जनजागृती वाहनांचे उद्घाटन

जल जीवन मिशन अंतर्गत जनजागृती वाहनांचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add