Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जल जीवन मिशन अंतर्गत जनजागृती वाहनांचे उद्घाटन

team by team
August 27, 2022
in राज्य
0
जल जीवन मिशन अंतर्गत जनजागृती वाहनांचे उद्घाटन
नंदुरबार l प्रतिनिधि
जल जीवन मिशनच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व ग्रामस्थांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी जिल्हा परिषद नंदुरबार , एन . एस . ई . फाऊडेशन व सिनी टाटा ट्रस्ट यांच्या सयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या जनजागृती वाहनांचे ( आय ईसी व्हॅन ) उद्घाटन जिल्हाधिकारी मनिषा खत्री व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते करण्यात आले .
 जलजीवन मिशन  अंतर्गत २०२४ पर्यंत  प्रत्येक कुटुंबाला दर माणसी प्रति दिवस ५५ लिटर  पिण्याचे शुद्ध ,पुरेसे व नियमित  पाणी मिळावे यासाठी जिल्हा परिषदेमार्फत जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या कामांना टप्या टप्याने मंजूरी देण्यात येवून कामांना सुरुवात झालेली आहे .
          या पार्श्वभूमीवर जलजीवन मिशनचा उद्देश , जल जीवन मिशन योजना यशस्वी होणेसाठी गावातील पदाधिकारी व ग्रामस्थ तसेच ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा समिती  यांची भूमिका  व कर्तव्य , पाणी पुरवठा  योजनेच्या उपगांचे गुणवत्ता निरिक्षण , योजनाची देखभाल दुरुस्ती, पाणी गुणवत्ता, सांडपाणी व्यवस्थापन, जल संवर्धन व स्त्रोत शाश्वत्ता याबाबत  ग्रामस्थांमध्ये जाणीव जागृती करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभाग तसेच एन . एस . ई . फाऊडेशन अंतर्गत सिनी टाटा ट्रस्ट यांच्या संयुक विद्यमाने जनजागती मोहिम सुरु करण्यात आली आहे . सदर मोहिमेसाठी जलजीवन मिशन विषयी माहिती असणारे तीन आयईसी व्हॅन तयार करण्यात आल्या असून सदर व्हॅन या अक्कलकुवा , धडगाव व तळेदा तालुक्यासाठी राहणार आहेत.
        जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय आवारात जिल्हाधिकारी मनिषा खत्री , मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी हिरवी झेंडी दाखवून या जन जागृती अभियानाची सुरुवात केली . यावेळी  ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय बावीस्कर , जिल्हा आरोग्य अधिकारी चौधरी सीनी टाटा ट्रस्टचे विभागीय समन्वयक साजिद मंसूरी, प्रकल्प व्यवस्थापक  निशांक गजभिये, सतिश एखंडे, पुजा धुले,  सत्यम ठाकुर, रोहित गुप्ता, शुभम खंदारे, सिद्धार्थ वाघ, दारासिंग पावरा,  अविनाश नाईक, पवन वळवी , किशोर जाधव , जामसिंग पावरा उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

विशेष गौरव पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Next Post

कोयलीविहीर येथे आ.आमश्या पाडवी यांच्या वाढदिवसानिमित्त शिबिरात 55 दात्यांचे रक्तदान

Next Post
कोयलीविहीर येथे आ.आमश्या पाडवी यांच्या वाढदिवसानिमित्त शिबिरात 55 दात्यांचे रक्तदान

कोयलीविहीर येथे आ.आमश्या पाडवी यांच्या वाढदिवसानिमित्त शिबिरात 55 दात्यांचे रक्तदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add