Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी प्रहार संघटनेच्या वतीने खा.डॉ.हिना गावीत यांना निवेदन

team by team
August 21, 2021
in शैक्षणिक
0
शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी प्रहार संघटनेच्या वतीने खा.डॉ.हिना गावीत यांना निवेदन

नंदुरबार | प्रतिनिधी
प्रहार शिक्षक संघटनेने शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी प्रखासदार डॉ.हिना गावीत यांची भेट घेतली व विविध मागण्यांचे निवेदन दिले.
यानिवेदनात म्हटले आहे की,नंदुरबार जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे वेतन दरमहा एक तारखेस होणे अपेक्षित असतांना नियमित जिल्ह्यातील शिक्षकांचे वेतन उशिरा होतात.त्यामुळे प्राथमिक शिक्षकांचे विविध कर्जाचे हप्ते वेळेवर न भरु शकल्यामुळे नेहमीच आर्थिक भुर्दळ व मानसिक त्रास सहन करावा लागतो.वेतन दरमहा एक तारखेला होण्यासाठी सीएमपी प्रणालीचा वापर करण्यात यावा.नंदुरबार जिल्ह्यातील सर्व डीसीपीएस धारकांना त्यांच्या डीसीपीएस कपातीचा सन २००८-०९ ते सन २०२०-२१ पर्यंतचा हिशोब शासन हिस्सा आणि व्याजासह वर्षनिहाय  मिळावा,.गणेश कौतिक पाटील प्राथमिक शिक्षक जि.प.शाळा करडे ता.तळोदा येथे दि .१८ जलै २०१७ पासून हजर होवुन  देखील आजतागायत विना वेतन सेवा करीत आहेत. श्री. पाटील हे अपंग एकात्मिक योजनेतील ५९५ यादीतील शिक्षक असून सन २००८ युनिट तपशिल मधील त्यांच्याबरोबर विशेष शिक्षक कार्यरत असून नियमित पगार घेत आहेत.९२ वस्तीशाळा शिक्षकांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षक,शिक्षणसेवक म्हणून नियुक्ती देण्यात आलेली असून अद्याप शासनकडून प्रशिक्षित होण्यासाठी एकही संधी उपलब्ध करुन दिलेली नाही.पेसा क्षेत्रात कार्यरत कर्मचार्‍यांसाठी शासनाने एकस्तर वेतन लागु केलेले असून त्याचबरोबर या क्षेत्रात कार्यरत इतर जिल्ह्यातील कर्मचार्‍यांना आंतरजिल्हा बदलीबाबत सवलती देण्यात आलेल्या आहेत.परंतु सध्या या शासन निर्णयातील केवळ एकस्तर वेतन प्रणाली लागु असून बदलीबाबत शासनाने जाहीर केलेल्या सवलतीचा उच्चार ऑनलाईन बदली धोरणात नसल्यामुळे या बदलीबाबतच्या सवलतींचा लाभ या आदिवासी व नक्षलग्रस्त क्षेत्रात काम करणार्‍या कर्मचार्‍यांना मिळत नाही , जिल्हा परिषदेमध्ये कर्मचार्‍यांनी भविष्य निर्वाह निधी अग्रीम काढण्यासाठीचे प्रस्ताव मोठ्या प्रमाणात सादर केले आहेत . बीडीएस प्रणाली बंद असल्यामुळे भविष्य निर्वाह निधी अग्रीम प्रस्ताव मंजुर केला जात नसल्याचे जिल्हा परिषदेच्या लेखा विभागाकडून सांगण्यात येत असते.तरी सदर मागण्यांबाबत आपण संबंधित विभागाला आदेश देवून मार्गी लावाव्यात अशी मागणी प्रहार शिक्षक संघटनेच्यावतीने करण्यात आली.खा.डॉ.हिना गावीत यांनी सदर मागण्या लवकरात लवकर मार्गी लावण्यात येतील असे आश्वासन दिले.यावेळी प्रहार शिक्षक संघटनेचे  नंदुरबार जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत,जिल्हा कार्याध्यक्ष विश्वास देसाई ,जिल्हा संघटक गणेश पाटील आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार- वाका चार रस्त्यावर २० लाखांची लुट, उपनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चौघांविरूध्द गुन्हा

Next Post

भिलीस्थान लायन सेनेच्या प्रदेशाध्यक्षपदी पंडित तडवी

Next Post
भिलीस्थान लायन सेनेच्या प्रदेशाध्यक्षपदी पंडित तडवी

भिलीस्थान लायन सेनेच्या प्रदेशाध्यक्षपदी पंडित तडवी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

November 4, 2026
दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

November 1, 2026
खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

November 1, 2026
सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

November 1, 2026
भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add