तळोदा l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण कमालीची वाढले आहे. विशेषतः आदिवासी महिलांचे जीवन उध्वस्त होत आहे. दुसरीकडे कुपोषणाची संख्या दुपटीने वाढली आहे.
बालविवाह मुक्त नंदुरबार अशी संकल्पना घेऊन महिला समुपदेशन केंद्रातर्फे गावातील नागरिकांनी ग्रामसभेत आमच्या गावात बालविवाह होऊ देणार नाही असा ठराव मंजूर करावा असे आवाहन राज्य महिला आयोगाचे जिल्हा समन्वयक राहुल जगताप आणि तळोदा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कोकणी यांनी केले.
तळोदा पंचायत समिती येथील सभागृहात ग्रामसेवकांच्या बैठकीत गट विकास अधिकारी बोलत होते.
तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या गावातील बालविवाह प्रतिबंधक केला पाहिजे. 18 वर्षा खालील कोणत्याही मुलगी आणि 21 वर्षा खालील मुलांनी विवाह करू नये. कायद्याने तो गुन्हा आहे. बालविवाह थांबले तर कुपोषणाला आळा बसेल. या पार्श्वभुमी ग्रामसेवकांची भूमिका महत्त्वाची आहे. असे मत गट विकास अधिकारी कोकणी यांनी व्यक्त केले.
ग्रामपंचायत स्तरावर ठराव करून तात्काळ बालविवाह थांबतील असे होणार नाही. मात्र गावकर्यांचे मनोबल आणि सामाजिक भान वाढणार आहे . सामाजिक जबाबदारी म्हणुन हा विषय हाताळला तर नंदुरबार बालविवाह मुक्त झाल्या शिवाय राहणार नाही. अशी अपेक्षा राहुल जगताप यांनी व्यक्त केली. बैठकीत मोठय़ा संख्येने ग्रामसेवक उपस्थित होते. अनेक ग्रामसेवक यांनी आपण यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही दिली.








