नंदुरबार l प्रतिनिधी
केंद्र सरकारच्या कामगार आणि रोजगार विभागाच्या संकेतस्थळावर असंघटीत कामगारांना सामाजिक सुरक्षा योजनाचा लाभ देण्यासाठी मासेमारी करणारे मच्छीमार, मत्स्य विक्रेते तसेच मत्स्यव्यवसायाशी निगडीत असलेल्या कामगारांनी https://register.eshram.gov.in ई-श्रम या संकेतस्थळावर जाऊन मत्स्य कामगारांची नोंदणी करावी असे आवाहन मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त, किरण पाडवी यांनी केले आहे.
नोंदणी करतांना मत्स्य व्यवसायाशी संबंधित मजुरांचे आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, बँक पासबुक इत्यादी माहितीसह नोंदणी करावी. नोंदणी झालेल्या मत्स्य व्यवसायीकांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत अपघाती मृत्यूनंतर 2 लाख व कायमचे अपंगत्व आल्यास एक लाख रुपये विमाच्या लाभासह इतर सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ यामुळे देता येणार आहे.
नोंदणी करण्यासाठी संबंधित व्यक्तीची वयोमर्यादा 16 ते 59 वर्षे असावे. कामगार हा कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे (EPFO) सभासद नसावा. कोणत्याही शासकीय वा निमशासकीय सेवेत नसावे. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय कार्यालय, प्लॉट नंबर 17, ‘परमात्मा’ कामनाथ महादेव नगर, एस्सार पेट्रोल पंप मागे, साक्री बायपास मार्ग, नंदुरबार (02564-297540) यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.








