Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

महाराष्ट्र लोकसेवा आयोग पूर्व परीक्षा केंद्र परिसरात प्रवेशास बंदी

team by team
August 18, 2022
in राज्य
0
महाराष्ट्र लोकसेवा आयोग पूर्व परीक्षा केंद्र परिसरात प्रवेशास बंदी

नंदुरबार l प्रतिनिधी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र राज्यसेवा पूर्व परीक्षा-2022 दि. 21 ऑगस्ट 2022 रोजी नंदुरबार येथे घेण्यात येणार असल्याने परीक्षा केंद्राच्या ठिकाणी गैरप्रकार होऊ नये व त्याठिकाणी शांतता व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होऊ नये यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) नुसार परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात प्रवेशास बंदीचे आदेशीत केले आहे.

शहरातील श्रीमती एच.जी. श्रॉफ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज, मोठा मारुती मंदिराजवळ, नंदुरबार, दुर्गाबाई रघुवंशी हायस्कुल, मुख्य डाक कार्यालयाजवळ,अंधारे स्टॉप नंदुरबार, डॉ.काणे गर्ल्स हायस्कूल, मुख्य डाक कार्यालय जवळ नंदुरबार, जी.टी. पाटील महाविद्यालय आय.टी.आय जवळ, शनि मंदिर रोड नंदुरबार, अशा 4 उपकेंद्रावर परीक्षा घेण्यात येणार आहे.

सदर परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात 21 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 7 वाजेपासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत परिक्षेसाठी संबंधीत नसलेल्या कोणत्याही व्यक्तीस प्रवेशास बंदी असेल. सदरचे आदेश परिक्षार्थी, नियुक्त कर्मचारी, अधिकारी, पोलीस, होमगार्ड यांचेसाठी लागू होणार नाही. तसेच परीक्षा केंद्राच्या जवळच्या 200 मीटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलीफोन, एस.टी.डी, आय.एस.डी, फॅक्स केंद्र, झेरॉक्स दुकाने, कॉम्प्युटर दुकाने व ध्वनीक्षेपक वापरासाठी या कालावधी मनाई असेल असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

मत्स्यव्यवसायाशी निगडीत कामगारांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी

Next Post

वाघशेपा येथे पुरलेले तीन मृतदेह वाहून गेल्याचा गावकऱ्यांचा दावा

Next Post
वाघशेपा येथे पुरलेले तीन मृतदेह वाहून गेल्याचा गावकऱ्यांचा दावा

वाघशेपा येथे पुरलेले तीन मृतदेह वाहून गेल्याचा गावकऱ्यांचा दावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add