Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

माजी सैनिकांना कृतज्ञता सन्मानपत्र देऊन गौरव तर गरजू ७५ विद्यार्थ्यांना ४५० वह्या वाटप, हिंदु सेवा सहाय्य समितीचा स्तुत्य उपक्रम

team by team
August 14, 2022
in राजकीय
0
माजी सैनिकांना कृतज्ञता सन्मानपत्र देऊन गौरव तर गरजू ७५ विद्यार्थ्यांना ४५० वह्या वाटप, हिंदु सेवा सहाय्य समितीचा स्तुत्य उपक्रम

नंदुरबार l प्रतिनिधी

आपल्या भारतमातेच्या रक्षण करत असतांना आपल्या जीवाचीही पर्वा न करता सैनिकांनी देश रक्षण केले याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माजी सैनिकांना कृतज्ञता सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले तसेच ७५ विद्यार्थ्यांना ४५० वह्या वितरण करण्यात आले. भारतीय स्वातंत्र्यचा अमृत महोत्सवनिमित्त हिंदु सेवा सहाय्य समितीने माजी सैनिकांसाठी कृतज्ञता सोहळा आयोजित केला होता. १३ ऑगस्ट रोजी लायन्स सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमाची प्रारंभ भारतमाता प्रतिमा पूजन, ध्वजवंदन आणि राष्ट्रगीताने झाली. व्यासपीठावर प्रमुख म्हणून नंदुरबारचे तहसीलदार भाऊसाहेब थोरात, उद्योगपती सुरेश अग्रवाल, प्रसिद्ध विधिज्ञ ॲड. अनिल लोढा, माजी सैनिक आणि हिंदु सेवा सहाय्य समितीचे नरेंद्र पाटील उपस्थित होते. राष्ट्रभक्तीपर गीत आणि प्रार्थना बालधर्मसेविका जागृती पाटील हिने सादर केले.

यानंतर प्रमुख पाहुण्यांचा हस्ते माजी सैनिकांना कृतज्ञता सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले त्यात माजी सैनिक सर्वश्री अरविंद निकम, राजेंद्र तांबोळी, दिपक पवार, महेश सोनवणे, कैलाश शेवाळे, गुलाब बागुल, नरेंद्र बागुल, राजेश गिरणार, सुनील मुंडे, वसंत वाघ, गजानन रघुवंशी, ज्ञानेश्वर शिरसाठ यांचा सन्मान करण्यात आला. संस्थेच्यावतीने बटर फ्लाय या लघुचित्रपटात उत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळाल्याबद्दल रणजितसिंह राजपूत यांचाही सन्मान करण्यात आला.

यावेळी एम. के.रघुवंशी प्राथमिक शाळेचे ७५ विद्यार्थ्यांना ४५० वह्या मान्यवरांच्या हस्ते भेट देण्यात आल्या. मनोगतात माजी सैनिक अरविंद निकम यांनी चायना वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करून जास्तीत जास्त तरुणांनी सैनिकात भरती होण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी माजी सैनिक नरेंद्र बागुल यांनीही आपले अनुभव सांगितले. कार्यक्रमाचा उद्देश हिंदु सेवा सहाय्य समितीचे नरेंद्र पाटील यांनी तर सन्मानपत्राचे वाचन राजू चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन तुषार सोनवणे यांनी तर आभार प्रदर्शन पंकज डाबी यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाची सांगता संपूर्ण वंदेमातरम आणि घोषणांनी करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हिंदु सेवा सहाय्य समितीचे धर्मसेवकांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

नवापुरात आज भाजपातर्फे तिरंगा रॅली व ना.डॉ.गावितांचा सत्कार समारंभ

Next Post

विभाजन विभिषिका स्मृती दिवस साजरा करण्याचे आवाहन

Next Post
विभाजन विभिषिका स्मृती दिवस साजरा करण्याचे आवाहन

विभाजन विभिषिका स्मृती दिवस साजरा करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add