Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

डी.आर.हायस्कूलमध्ये क्रांती दिवस व विश्व आदिवासी गौरव दिवस उत्साहात साजरा

team by team
August 8, 2022
in शैक्षणिक
0
डी.आर.हायस्कूलमध्ये क्रांती दिवस व विश्व आदिवासी गौरव दिवस उत्साहात साजरा

नंदुरबार l प्रतिनिधी

येथील श्रीमती डी.आर.हायस्कूल येथे क्रांती दिवस व विश्व आदिवासी गौरव दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेतील विद्यार्थ्यांनी खाजा नाईक,बिरसा मुंडा,तंट्या भिल, शहीद भगतसिंग सुखदेव यांची वेशभूषा परिधान केल्या तसेच शाळेतील शिक्षक-शिक्षिकांनी सुद्धा आदिवासी परंपरेचे पेहराव करून गावात आदिवासी शस्त्र व वाद्यसह शिबली नृत्य करत शोभायात्रा काढण्यात आली.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक नारायण भदाणे तर प्रमुख वक्ते म्हणून दाज्या पावरा (पंचायत समिती सदस्य तळोदा) हे लाभले. व्यासपीठावर उपमुख्याध्यापक सुभाष चौधरी,ज्येष्ठ पर्यवेक्षक पंकज पाठक, उत्सव समिती प्रमुख राजेंद्र लांडगे उपस्थित होते.

 

कार्यक्रमाची सुरुवात शाळेतील विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व आदिवासी पावरी स्वागत गीताने केले.कार्यक्रमाच्या प्रास्ताविक सुहास वळवी यांनी हा दिवस का साजरा केला जातो? व त्या मागचे उद्देश काय? हे स्पष्ट केले. मान्यवरांच्या हस्ते तंट्या भिल,खाजा नाईक,बिरसा मुंडा, क्रांतिवीर भगतसिंग,सुखदेव यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रमुख पाहुण्यासमोर आदिवासी वाद्य प्रकारातील एक विशिष्ट प्रकार थाळीवर काठी ठेवून विशिष्ट पद्धतीने वाजवून दाखविले. व त्याची माहिती निलेश गावित यांनी दिली.

शाळेतील विद्यार्थी प्रणील सोनवणे व भूषण आव्हाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले दाज्या पावरा यांनी स्वातंत्र्यसंग्रामातील नंदुरबार जिल्ह्यातील चळवळी व आदिवासी क्रांतिकारकांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान सांगितले.

या दिनाच्या औचित्याने शाळेत निबंध स्पर्धा दोन घेण्यात आली.निबंध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांची नावे पुढील प्रमाणे-गट 1 ला -५ वी ते 7 वी, प्रथम, मोहित बावा ,7वी ब, द्वितीय जन्मेंजय पगारे, 7वी ड तृतीय -सोहम माळी, 6वी क, उत्तेजनार्थ -रोशन पाटील ,7वी ब, उत्तेजनार्थ कुणाल पाटील 6वी ड, गट 2 रा -8 वी ते 10 वी, प्रथम -सार्थक पवार, 8वी ड द्वितीय समर्थ मोरे 8वी-ई तृतीय अभिषेक सोनार 8वी ड, उत्तेजनार्थ श्यामसिंग जाधव 10ड उत्तेजनार्थ लकेश नायक 8वी ड, उत्तेजनार्थ भूपेंद्र पाटील 9 वी अ

यावेळी मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
निबंध स्पर्धेचे परीक्षण उत्सव समिती प्रमुख राजेंद्र लांडगे व तुषार नांद्रे यांनी केले.
अध्यक्षीय समारोपामध्ये मुख्याध्यापक नारायण भदाणे यांनी आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे जतन व आपले कर्तव्य काय आहेत? हे स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन हेमंत खैरनार,स्वागत सत्कार बागुल मॅडम तर ऋणनिर्देश कमल चौरे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने ‘आदिवासी नृत्य महोत्सवाचे’ आयोजन

Next Post

नंदुरबार जिल्हा डी.जे. मुक्त व डॉल्बी मुक्त करण्याचा प्रयत्न : विशेष पोलीस महानिरीक्षक, डॉ. बी.जो. शेखर पाटील

Next Post
नंदुरबार जिल्हा डी.जे. मुक्त व डॉल्बी मुक्त करण्याचा प्रयत्न : विशेष पोलीस महानिरीक्षक, डॉ. बी.जो. शेखर पाटील

नंदुरबार जिल्हा डी.जे. मुक्त व डॉल्बी मुक्त करण्याचा प्रयत्न : विशेष पोलीस महानिरीक्षक, डॉ. बी.जो. शेखर पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

May 19, 2026
पक्ष संघटना मजबूत करा,माजी आ. शिरीष चौधरी

पक्ष संघटना मजबूत करा,माजी आ. शिरीष चौधरी

May 19, 2026
अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना दिलासा; 953 शेतकरी लाभार्थी

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना दिलासा; 953 शेतकरी लाभार्थी

May 19, 2026
नंदुरबार जिल्हा परिषदेकडून ‘नो व्हेईकल डे’ उपक्रम

नंदुरबार जिल्हा परिषदेकडून ‘नो व्हेईकल डे’ उपक्रम

May 19, 2026
बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

May 16, 2026
भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

May 16, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add