नंदुरबार ! प्रतिनिधी
सुरत- भुसावळ पॅसेंजर मधील प्रवाशांना चाकूचा धाक दाखवत लुटमार करणाऱ्या टोळीचा लोहमार्ग पोलिसांनी पर्दाफाश केला असून, याप्रकरणी ४१ हजार २० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून ६ जणांना अटक केली आहे.दरम्यान टोळीतील दोघे फरार असून लोहमार्ग पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमळनेर ते धरणगांव दरम्यान दि.6 ऑगस्ट रोजी रात्री ट्रेन नं . 09007 सुरत भुसावळ पॅसेंजर मधील प्रवासी राजेशकुमार यादव भोला यादव रा. पकरिया , पोस्ट लखयपुर , थाना मोहनपुर जि . गया ( बिहार ) व त्याचे सोबत असलेले सहप्रवासी एकुण 9 असे उधना ते भुसावळ असा प्रवास करीत असताना अमळनेर येथुन गाडी सुटल्यानंतर सात ते आठ इसमांनी चाकुचा धाक दाखवुन त्याना मारहाण करून त्याचे जवळील रोख रक्कम व मोबाईल असा एकुण 43 हजार 450 रुपयांचा माल जबरीने लुटमार अंधाराचा फायदा घेत फरार झाले. फिर्यादीवरून ७ ते ८ अनोळखी संशयीत आरोपी यांच्याविरूध्द लोहमार्ग पोलीस ठाणे भुसावळ येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. लोहमार्ग औरंगाबाद तांत्रिक व गोपनीय माहितीव्दारे सदर दरोडाचा गुन्हा उघडकीस आणुन दरोडा टाकणारी टोळीला जेरंबद करत दादु संजय सोनवणे रा . कंजरवाडा नंदुरबार , मोहन रघुनाथ गोसावी रा . तिन दगडी वार्ड वराळसिम , ता . भुसावळ , जि . जळगांव हल्ली वाकानेरा चलथाना ता . पलसाना , जि . सुरत, अशोक मकराम राठोड रा . सांगवी ताडा शाळेचे मागे ता . चाळीसगांव , जि . जळगांव पुरूषोत्तम राजेन्द्र पाटील रा . किनगांव चिचाडा रोड , ता . यावल , जि . जळगांव , सुनिल उर्फ भैय्या संतीलाल कोळी रा . हल्ली हातेड , ता , चोपडा , जि . जळगांव , मुळ गांव बाबळज , ता . शिरपुर जि . धुळे , अण्णा उर्फ वासुदेव पंडित पाटील रा. मुळ किनगांव , ता . यावल , जि.जळगांव , हल्ली गणेश नगर सपना पान सेंटर समोर , गल्ली नं . 1 लिबायत सर्कल , उधना सुरत गुजरात यांना अटक करून त्यांच्या ताब्यातून 19 हजार 20 रोख रूपये व गुन्हयातील ९ हजारचे दोन मोबाइल तसेच गुन्हया व्यतिरिक्त त्याच्याकडे मिळुन आलेले १३ हजाराचे दोन मोबाईल, गुन्हयात वापरलेले दोन चाकु असा एकुण 41 हजार 20 रूपये किमतीचा माल हस्तगत करण्यात आला आहे . तसेच गुन्हयातील टोळीतील दोन त्यांचे साथीदारचा फरार असून त्यांच्या शोध चालु आहे . सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक लोहमार्ग औरंगाबाद वैभव कलबुर्गे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिपक काजवे , लोहमार्ग मनमाड यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली अन्वेषन अधिकारी पोलीस निरीक्षक दिलीप गढरी , पोउनि माधव जिव्हारे , पोहवा प्रकाश गोसावी , पोहवा शामसिंग वळवी , पोना रविद्र पाटील , कैलास चौधरी, जयकुमार कोळी , पोना योगेश चौधरी , पोशि जितेंद्र चौधरी , राजेश घोराडे , पोशि निलेश महाजन तसेच स्था.गु.शा.लोहमार्ग औ.बाद येथील पोलीस निरीक्षक दिलीप साबळे , पोउनि नेटके , असई / आचार्य , पोशि / प्रमोद पाटील यांच्या सयुक्त पणे केली.