नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा युवासेनेच्या उपजिल्हा अधिकारीपदी सागर पाटील तसेच नंदुरबार शहर अधिकारीपदी शिवाजी कोळी यांची निवड करण्यात आली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे तथा सचिव वरुण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर महाराष्ट्र विभागीय सचिव विराज कावडीया आणि नंदुरबार जिल्हा युवासेनेचे जिल्हा अधिकारी अर्जुन सुधाकर मराठे यांच्या शिफारशीने नंदुरबार जिल्हा युवासेनेची नुतन कार्यकारिणी घोषीत करण्यात आली.
कार्यकारिणीत युवासेनेच्या नंदुरबार विधानसभा उपजिल्हा अधिकारीपदी सागर सुरेश पाटील, जिल्हा सचिवपदी दिनेश भोपे, जिल्हा संघटकपदी राहुल टिभे, नंदुरबार विधानसभा तालुका अधिकारीपदी भावसाहेब ओंकारसिंग गिरासे, उपतालुका अधिकारीपदी प्रसाद प्रमोदसिंग गिरासे तसेच युवासेनेच्या नंदुरबार शहर अधिकारीपदी शिवाजी (दादा) हिरालाल कोळी यांची निवड करण्यात आली आहे.
मुंबई येथे शिवसेना भवनात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सदर निवड घोषीत करण्यात आली. राष्ट्रीय सचिव वरुण सरदेसाई, उत्तर महाराष्ट्राचे विभागीय सचिव विराज कावडीया, नंदुरबार जिल्हा युवासेनेचे जिल्हाधिकारी अर्जुन सुधाकर मराठे उपस्थित होते. यावेळी नंदुरबार जिल्हा युवासेनेच्या पदाधिकार्यांकडून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला.