नंदूरबार l प्रतिनिधी
भारताच्या सर्वोच्च पदी द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेऊन त्या पदावर विराजमान झाल्या. त्यानिमित्ताने नवापुर तालुक्यात व नवापुर शहरात भाजपा तालुकाध्यक्ष भरत गावित यांच्या मार्गदर्शनाखाली, भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष एजाज शेख यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून याठिकाणा पासून महात्मा गांधी पुतळ्या पर्यंत आदिवासी ढोल, छिबली, नृत्य करत मिरवणूक काढून मोठ्या जल्लोषात आनंदोत्सव साजरा केला.

भारताच्या सर्वोच्च पदावरती प्रथमच एक आदिवासी महिला विराजमान होते ही सर्व भारतीयांच्यासाठी व आदिवासी बांधवांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. द्रौपदी मुर्मू यांची पार्श्वभूमी ही आदिवासी आहे.मात्र त्यांनी आधुनिक काळ लक्षात घेऊन योग्य असे शिक्षण घेतले. याच शिक्षणाच्या जोरावर द्रौपदी मुर्मूजी या शिक्षिका झाल्या. विद्यार्थ्यांना शिकवत असतानाच त्या राजकीय क्षेत्राकडे वळल्या.
आपल्या अभ्यासू, राजकीय हुशारीच्या जोरावर त्यांनी मंत्री, राज्यपाल अशी पदे भूषविली. आपल्या कार्यकाळात केलेल्या कामाच्या जोरावर त्यांना देशाच्या राष्ट्रपती पदाच्या भाजपा प्रणित एनडीए च्या उमेदवार म्हणून संधी मिळाली. एक कर्तृत्ववान महिला आज देशाच्या १५ व्या राष्ट्रपती तथा पहिल्या आदिवासी राष्ट्रपती म्हणून विराजमान झाल्या आहेत.
नंदुरबार जिल्ह्यासह नवापुर तालुका हा आदिवासी बहुल तालुका असल्याने द्रौपदी मुर्मूच्या शपथविधी निमित्त नवापुर भाजपा तालुकाध्यक्ष भरत गावित यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी पारंपरिक ढोल, छिबली व नृत्य करत मिरवणूक काढून भव्य आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस राजेंद्र गावित, भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष एजाज शेख, नवापुर शहर प्रभारी रमला राणा, प्रदेश कार्यकारणी सदस्य जाकीर पठाण, तालुका उपाध्यक्ष जितेंद्र अहिरे,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष दिनेश चौधरी,जैनू गावीत,माजी नगरसेविका सुनीता वसावे,शहर महिला अध्यक्ष जिज्ञासा राणा, सोशिअल मीडिया हेमंत शर्मा,गोपी सैन, जितू मावची,शहर सरचिटणीस अजय गावीत,कुणाल दुसाने,सौरव भामरे,शामु मावची,शहर उपाध्यक्ष स्वप्नील मिस्त्री, सोशल मीडिया प्रदेश संयोजक निलेश प्रजापत, जिल्हा कार्यकारणी सदस्य घनश्याम परमार, भीमसिंग पाडवी, भावीन राणा, आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान विसरवाडी येथील माणिकरावदादा गावित सार्वजनिक हायस्कुलच्या सर्व विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी व विसरवाडी येथील नागरिकांनी यात जातीने सहभाग नोंदवत आनंदोस्तव साजरा केला याप्रसंगी भाजपा जिल्हा सरचिटणीस राजेंद्र गावित, अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष एजाज शेख, विसरवाडी शहर अध्यक्ष रामसिंह ठाकूर, उपाध्यक्ष अनुज अग्रवाल, अर्जुन कुंभार सर, रमेश गावित, जयसिंग गावित, शिंगा गावित सह असंख्य कार्यकर्ते, विद्यार्थी उपस्थित होते.








