नंदूरबार l प्रतिनिधी
विधी सेवा उप समिती ,उच्च न्यायालय ,औरंगाबाद आणि अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश ,नंदुरबार यांच्या निर्देशानुसार अक्कलकुवा तालुक्यातील पश्चिम खान्देश भिल्ल सेवा मंडळ नंदुरबार संचलित आश्रम शाळा मोलगी यांच्या प्रांगणात ‘न्याय आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र विधीसेवा प्राधिकरणामार्फत सुरु करण्यात आलेल्या फिरत्या लोक न्यायालयाचे (मोबाइल व्हॅन) व कायदे विषयक शिबिराचे उद्घाटन अक्कलकुवा न्यायालयाचे न्यायाधीश व्ही.पी.शिंदे व सहा.पोलीस निरीक्षक जितेंद्र वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
प्रारंभी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व सरस्वती माता यांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शिबिराची प्रास्ताविक अॅड.रुपसिंग वसावे यांनी केली व प्रास्ताविकेत राज्याच्या विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने न्याय आपल्या दारी कायदेविषयक साहाय्य या उपक्रमांतर्गत फिरत्या न्यायालयाचा उपक्रम राबविण्यात येत आहे.
व यासाठी प्रशस्त सुशोभित व्हॅनमध्ये न्यायालयाची रचना केली आहे.फिरत्या न्यायालयाचा उद्देश विशद केला.या शिबिरात अॅड.पी.आर.ठाकरे,अॅड.संग्राम पाडवी,अॅड.राजेंद्र इंदिस,सरकारी वकील एम.आय.मन्सुरी व सहा. पोलिस निरीक्षक जितेंद्र वाघ यांनी कायदेविषयक शिबिरात मार्गदर्शन केले.
विधी सेवा प्राधिकरणातर्फे कायदेविषयक साहाय्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे. दुर्गम भागात अनेक नागरिकांचे कायद्याविषयीची माहिती फारच कमी आहे. यामुळे फिरते न्यायालयाच्या माध्यमातून कायदेविषयक साक्षरता शिबीरे घेऊन जागृती करण्यात आली. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे.
त्या तुलनेत नंदुरबार जिल्ह्यात हे प्रमाण फार कमी आहे. असे असले तरी शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, यासाठी त्यांना शेती योजनांची माहिती देण्यात आली.व पुढे बोलतांना न्यायमूर्ती व्ही.पी.शिंदे म्हणाले कि,ग्रामीण क्षेत्रातील गरीब नागरिकांपर्यंत विधी सेवा पोहचावी. कायद्याचे राज्य आहे, यावर त्यांचा विश्वास दृढ व्हावा आणि निरक्षर लोकांमध्येही विधी साक्षरता वाढीस लागावी म्हणून ही कल्पना पुढे आली आहे.
फिरत्या न्यायालयाद्वारे मोटार वाहन, आपसी वाद-विवाद, बँकांची वसुली, वजन-मापांच्या तक्रारी, कौटुंबीक वाद आदी प्रलंबीत खटल्यांची सुनावणी केली जात असल्याचे न्यायमूर्ती व्ही.पी.शिंदे यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणांत सांगितले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अॅड.एस.व्ही.वाणी , अॅड.आर.आर.मराठे, अॅड.एस.आर.राणे , अॅड. एस.पी.कापुरे ,अॅड. आर.टी. वसावे , अॅड.ए.एम.वसावे, अॅड फुलसिंग वळवी,अॅड.दिपक वळवी, अॅड. जे.टी. वळवी,अॅड.जे.टी. तडवी, अॅड.आर.पी.तडवी, अॅड.डी.एफ.पाडवी,अॅड.एस. एच वसावे, अॅड.डी. डी. पाडवी, अॅड.एच. एन.पाडवी, अॅड.एम.डी. वसावे,अॅड. आर.ए. वळवी, अॅड.सरदार वसावे, अॅड. राज नाईक,अॅड. व्ही.एस.पिंगळे,आधी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक दिलीप नगराळे,नटवर तडवी संजय बोरसे, ज्योती तडवी, निशा वळवी,उदय गावित,अनिल गावित,लोटन पावरा, ,राजश्री चौधरी,शिवदास वसावे,प्रभात देसले,बाळाजी रसाळ, दिपाली पाटील,आणि सर्व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते व अक्कलकुवा न्यायालयाचे सहा. अधिक्षक विनायक पाडवी,
लघुलेखक मयूर पाटील, राजेश वळवी, योगेश साळुंखे, संतोष ठाकूर, सचिन फलाने, प्रशांत भालेराव,मनोज लोहार,धिरसिंग वळवी, व न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन राहुल पाटील यांनी केली व आभार अॅड. गजमल वसावे यांनी मानले. या शिबिरास अक्कलकुवा वकील संघाचे सदस्य, व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत ने करण्यात आली.