नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यातील वावद येथील सरलकृष्ण शेतकरी उत्पादक कंपनी अंतर्गत “ग्राहक सेवा केंद्र” (CSC) व खत गोडाऊनचे जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले
यावेळी जि प. उपाध्यक्ष राम रघुवंशी, DDM, नाबार्ड प्रमोद पाटील , कृषिविकास अधिकारी जि.प. प्रदीप लाटे, उपायुक्त, प.स.संवर्धन विभाग डॉ.उमेश पाटील , तांत्रिक अधिकारी कृषी विभाग वसंत चौधरी , विजय मोहिते,
तालुका कृषी अधिकारी श्री. शेळके, वरिष्ठ शास्त्रज्ञ राजेंद्र दहातोंडे , पद्माकर कुंदे, आत्माचे चंद्रकांत बागुल, सरलकृष्ण शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष मनोज पाटील, अशोक पाटील , संतोष पाटील. शामराव पाटील व संचालक, श्रीमती माधुरी गचाले सीएससी मुंबई कृषि सेवा विभाग प्रमुख एम.सी. पाटिल आदी उपस्थित होते.
माजी क्षेत्रीय व्यवस्थापक इफको मुंबई तथा माजी विभागीय व्यवस्थापक एमसीडीसी धुळे विभाग यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या प्रसंगी भागधारक व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी मनीषा खत्री यांनी सांगितले की, शासनाच्या विविध योजना सर्वसामान्यापर्यंत पोहचविण्यासाठी ग्राहक सेवा केंद्राने प्रयत्न करावे तसेच शेतकऱ्यांना गावस्तरावर शेती हंगामात खतांची उपलब्धता, सेंद्रिय उत्पादने, सुधारित तंत्रज्ञानाची जागरुकता तसेच आपल्या परिसरात कृषी आधारित उद्योग यासाठी शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून सामुहिक प्रयत्न करावेत असे आपल्या मार्गदर्शनात उपस्थिताना सांगितले.








