Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भररस्त्यातील जीवघेण्या खड्याची व ड्रेनेची तातडीने दुरुस्ती करा: हिंदु सेवा सहाय्य समितीची मागणी

team by team
July 13, 2022
in राजकीय
0
भररस्त्यातील जीवघेण्या खड्याची व ड्रेनेची तातडीने दुरुस्ती करा: हिंदु सेवा सहाय्य समितीची मागणी

नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील चैतन्य चौक, भोई गल्लीजवळ भररस्त्याचा मध्यभागी भलेमोठा असा खड्डा पडला आहे.तसेच याच भागात दोन ड्रेनेजचे झाकण उघडे असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही यासाठी याची तातडीने दुरुस्ती करावी.

अशी मागणी मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षा यांना निवेदनातून केली या आशयाचे निवेदन प्रशासकीय अधिकारी जयसिंग गावित यांना हिंदु सेवा सहाय्य समितीचे नरेंद्र पाटील, राजू चौधरी, पंकज डाबी यांनी दिले.

या निवेदनात पुढे नमूद केले आहे की, या भागात वाहनांची आणि पादचारींची मोठी वर्दळ असते तसेच या भागात खाजगी शिकवणी वर्गसुद्धा चालतात त्याठिकाणी अनेक लहान मुले शिकवणीसाठी येतात. याच भागामध्ये दर मंगळवारी व्यावसायिक आठवडे बाजारनिमित्त आपले दुकाने लावत असतात.

त्याठिकाणी रस्त्याचा मध्यभागी भलामोठा जीवघेणा खड्डा आहे सदर खड्डा हा वळण रस्त्यावर असल्याने आतापर्यंत अनेक लहान अपघातही झाले आहेत. आता पावसाळा सुरू झाल्याने याच वळण रस्त्यावरून उंच भागातील नवनाथ नगर परीसरातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा लोंढा वाहून येतो

पाण्याचा मोठ्या लोंढ्यामुळे हा खड्डा लक्षात येत नाही तसेच धर्मदास राजपूत यांचा घराजवळ आणि डॉ.बागुल यांचा घरामागे ड्रेनेजचे झाकण अर्धवट लागत असल्याने त्यात पडून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तरी नगरपालिकेने मोठा अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन जीवघेणा खड्डा आणि ड्रेनेजची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

वावद येथे ग्राहक सेवा केंद्र व खत गोडाऊनचे जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांच्या हस्ते उद्घाटन

Next Post

संत रविदास नोकरदार समाज उन्नती मंडळातर्फे सेवानिवृत्तांसह गुणवंत सत्काराने भारावले

Next Post
संत रविदास नोकरदार समाज उन्नती मंडळातर्फे सेवानिवृत्तांसह गुणवंत सत्काराने भारावले

संत रविदास नोकरदार समाज उन्नती मंडळातर्फे सेवानिवृत्तांसह गुणवंत सत्काराने भारावले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add