नंदुरबार l प्रतिनिधी
येथील वे. खा. भगिनी सेवा मंडळ धुळे संचलित कमला नेहरू कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नंदुरबार येथे फ्लाईंग ऑफिसर कुणाल पवार यांनी यशप्राप्तीचे अनुभव व स्पर्धा परीक्षा यावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी प्राचार्या सौ.व्ही.एन.पाटील ,कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे फ्लाईंग ऑफिसर कुणाल पवार तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य बी.सी.पवार उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचलन प्रा.डी.बी.पाटील यांनी केली. कार्यक्रमातील प्रमुख पाहुण्यांचा सत्कार सौ.व्ही.एन.पाटील व बी.सी.पवार यांनी केला व मॅरेथॉन स्पर्धेतील सहभागी विद्यार्थिनींनीचा सत्कार फ्लाईंग ऑफिसर कुणाल पवार यांनी केला व नंतर विद्यार्थिनींनी मार्गदर्शन केले व संवाद साधला
तसेच जिल्हयातील जास्तीत जास्त विद्यार्थिनींनी भारतीय सेनेत अधिकारी होण्यासाठी परिश्रम घ्यावेत त्यांना मार्गदर्शनासाठी सदैव तयार असेल, अशी प्रतिक्रिया कृणाल पवार यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व विद्यार्थिनींनी चांगला प्रतिसाद दिला. यावेळी कार्यक्रमास कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते व कार्यक्रमाचे आभार श्री.जे.यु.पाटील
यांनी मानले.