Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

श्रीरामपूर येथे वृक्ष दिंडीने माझी वसुंधरा अभियानाचा शुभारंभ

team by team
July 1, 2022
in सामाजिक
0
श्रीरामपूर येथे वृक्ष दिंडीने माझी वसुंधरा अभियानाचा शुभारंभ

नंदुरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील श्रीरामपूर येथे आज महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त गावात वृक्ष दिंडी काढून माझी वसुंधरा अभियान टप्पा तीन चा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी गाव परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. श्रीरामपूर ता. नंदुरबार या ग्रामपंचायतीने माझी वसुंधरा अभियानात सहभाग घेतला आहे .त्या अनुषंगाने आज दिनांक १ जुलै 2022 रोजी महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सुवर्णा पवार , वनपाल वर्षा चव्हाण तसेच गावाचे सुपुत्र व कणकवली येथे कार्यरत असलेले नायब तहसीलदार आर.जे .पवार विस्तार अधिकारी भैय्यासाहेब निकुंभे यांच्या उपस्थितीत गावातून वृक्ष दिंडी काढण्यात आली. यावेळी उपस्थित ग्रामस्थ व विद्यार्थी यांना वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन याचे महत्त्व पटवून देण्यात आले .

यानंतर नायब तहसीलदार आर .जे. पवार यांनी विविध प्रकारच्या भेट दिलेल्या 100 , सेवानिवृत्त कर्मचारी करम गायकवाड यांनी 25, दयाराम गायकवाड यांनी 25 तर वन विभागामार्फत 100 असे एकूण २५० वृक्षांची स्मशानभूमी व परिसरात लागवड करण्यात आली .यावेळी गट विकास अधिकारी सुवर्णा पवार यांनीही त्यांच्या आईच्या स्मरणार्थ ग्रामपंचायतीस 100 वृक्ष भेट देण्याचे जाहीर केले.

वृक्षदिंडीत शाळेचे सर्व विद्यार्थी व ग्रामस्थ सहभागी झाले होते . यावेळी माजी सरपंच विमलबाई गांगुर्डे शत्रुघ्न गांगुर्डे , रुस्तुम गुरुजी , पोलीस पाटील चंदू गायकवाड , ग्रामसेविका रुपाली देवरे ,शिक्षक सोनवणे , कुलकर्णी ,देवरे ,वाडीले आदींसह अंगणवाडी सेविका , मदतनीस , आशा वर्कर उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

चक्क शहरातील प्रवेशद्वाराजवळ गांजाची विक्री, दीड किलो सुका गांजा जप्त

Next Post

तालिबानी पध्दतीने अमानुष खून करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा: हिंदु सेवा सहाय्य समितीची मागणी

Next Post
तालिबानी पध्दतीने अमानुष खून करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा:  हिंदु सेवा सहाय्य समितीची मागणी

तालिबानी पध्दतीने अमानुष खून करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा: हिंदु सेवा सहाय्य समितीची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

May 19, 2026
पक्ष संघटना मजबूत करा,माजी आ. शिरीष चौधरी

पक्ष संघटना मजबूत करा,माजी आ. शिरीष चौधरी

May 19, 2026
अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना दिलासा; 953 शेतकरी लाभार्थी

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना दिलासा; 953 शेतकरी लाभार्थी

May 19, 2026
नंदुरबार जिल्हा परिषदेकडून ‘नो व्हेईकल डे’ उपक्रम

नंदुरबार जिल्हा परिषदेकडून ‘नो व्हेईकल डे’ उपक्रम

May 19, 2026
बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

May 16, 2026
भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

May 16, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add