Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अत्याधुनिक गस्त प्रणाली साहित्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांचे हस्ते वाटप

team by team
June 29, 2022
in क्राईम
0
अत्याधुनिक गस्त प्रणाली साहित्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांचे हस्ते वाटप

नंदूरबार l प्रतिनिधी

नंदुरबार जिल्हा पोलीस दलासाठी अत्याधुनिक गस्त प्रणाली साहित्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांचे हस्ते वाटप करण्यात आले.

 

नागरिकांच्या समस्या लक्षात घेता पोलीसांनी सर्व घटनांना जलद प्रतिसाद दिला पाहिजे , पोलीस घटनास्थळी तात्काळ पोहोचून लवकरात लवकर नागरिकांच्या समस्यांचे निराकरण झाले पाहिजे .

पोलीसांबाबत जनतेकडून असलेल्या अपेक्षा पुर्ण करण्यासाठी तसेच पोलीस दलाची जनमाणसातील प्रतिमा उंचावण्यासाठी व प्रत्येक कारवाई परिणामकारक ठरावी याकरीता पोलीसांचा प्रतिसाद जलद राहणे अत्यंत आवश्यक आहे.

यासर्व बाबींचा विचार करुन पोलीस महासंचालक , महाराष्ट्र राज्य , मुंबई यांनी पोलीस दलाचे आधुनिकीकरणाचा भाग म्हणून अत्याधुनिक गस्त प्रणालीचे ( RFID – Radio Frequency Identification Patrolling System ) साहित्यांचे वाटप करण्याचा निर्णय घेतला होता . सद्या गुन्हेगार अत्याधुनिक पध्द्तीचा वापर करुन गुन्हे करीत असल्याचे निदर्शनास आल्याने गुन्ह्यांच्या प्रमाणात देखील वाढ झाली आहे .

तसेच नागरिकांच्या मदतीसाठी किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास घटनास्थळी अतिजलद गतीने पोहचता यावे व पोलीस दल आधुनिक , कार्यक्षम व प्रभावी होण्यासाठी अत्याधुनिक गस्त प्रणाली ( Radio Frequency Identification Patrolling System ) साहित्यांचे वाटप नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांच्या हस्ते नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना देण्यात आले .

त्यामध्ये नंदुरबार उप विभागामध्ये 20 , शहादा उप विभागामध्ये 16 , अक्कलकुवा उप विभागामध्ये 12 असे एकुण 48 मशिन व 50 कार्डाचे वाटप करण्यात आले . अत्याधुनिक गस्त प्रणाली ( RFID Patrolling System ) यंत्रणा नंदुरबार जिल्ह्यात सक्रीय करुन जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत असलेले महत्वाचे ठिकाण , शाळा , महाविद्यालय , धर्मस्थळे , मिश्र वस्ती ,

संवेदनशिल भाग , बँक , ATM , सराफ बाजार , बस स्थानक , रेल्वे स्थानक , बाजारपेठ , गर्दीचे ठिकाण इत्यादी ठिकाणी अत्याधुनिक गस्त प्रणालीचे ( RFID Patrolling System ) यंत्रणा कार्यान्वीत करण्यात आलेली आहे .

अत्याधुनिक गस्त प्रणालीमुळे ( RFID Patrolling System ) अचानक एखादी घटना उद्भवल्यास तात्काळ त्याठिकाणी पोलीस मदत मिळण्याकरीता ह्या यंत्रणेचा उपयोग होणार आहे अशी माहिती नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी सांगितले .

सदर कार्यक्रमाच्या वेळी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील , अपर पोलीस अधीक्षक विजय पवार , पोलीस उप अधीक्षक ( मुख्यालय ) विश्वास वळवी , उप विभागीय पोलीस अधिकारी , नंदुरबार सचिन हिरे , उप विभागीय पोलीस अधिकारी , शहादा श्रीकांत घुमरे ,उप विभागीय पोलीस अधिकारी , अक्कलकुवा संभाजी सावंत तसेच इतर पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते .

बातमी शेअर करा
Previous Post

औरंगाबादचे नाव संभाजीनगर, उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याबाबतच्या प्रस्तावास मंत्री मंडळास मान्यता

Next Post

जलशक्ती अभियानातंर्गत केंद्रीय समितीने घेतला जिल्ह्यातील कामांचा आढावा

Next Post
जलशक्ती अभियानातंर्गत केंद्रीय समितीने घेतला जिल्ह्यातील कामांचा आढावा

जलशक्ती अभियानातंर्गत केंद्रीय समितीने घेतला जिल्ह्यातील कामांचा आढावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

February 7, 2026
खोंडामळी येथे माता वाघेश्वरी देवीची भक्तिमय प्राणप्रतिष्ठा

खोंडामळी येथे माता वाघेश्वरी देवीची भक्तिमय प्राणप्रतिष्ठा

February 7, 2026
नवापूर तालुक्यात 10 फेब्रुवारीपासून ‘हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहीम’

नवापूर तालुक्यात 10 फेब्रुवारीपासून ‘हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहीम’

February 7, 2026
नंदुरबार येथे ८ फेब्रुवारी रोजी  आदिवासी विकास मंत्र्यांच्या उपस्थितीत वनहक्क पट्टे वाटप मेळावा

नंदुरबार येथे ८ फेब्रुवारी रोजी आदिवासी विकास मंत्र्यांच्या उपस्थितीत वनहक्क पट्टे वाटप मेळावा

February 7, 2026
उबाठा तर्फे हेल्मेट घालूनच दिले निवेदन, कारवाई नको ‘दंडाआधी हेल्मेट’ची मागणी

उबाठा तर्फे हेल्मेट घालूनच दिले निवेदन, कारवाई नको ‘दंडाआधी हेल्मेट’ची मागणी

February 7, 2026
केंद्रीय अर्थसंकल्पामुळे विकासाला नवी दिशा : डॉ. हिना गावित

केंद्रीय अर्थसंकल्पामुळे विकासाला नवी दिशा : डॉ. हिना गावित

February 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add