Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून जन सुनावणींच्या तारखा जाहीर

team by team
June 24, 2022
in राज्य
0
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून जन सुनावणींच्या तारखा जाहीर

नंदूरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडे प्राप्त निवेदनांच्या अनुषंगाने पुणे, अमरावती व नाशिक या विभागांमध्ये आयोगातर्फे जन सुनावणी आयोजित करण्यात आली आहे.

या सुनावणी अनुषंगाने आयोगाने विविध विभागांसाठी वेगवेगळ्या तारखा व वेळा निश्चित केल्या आहेत. त्यानुसार संबधित जाती/जमातींनी ठरवून दिलेल्या तारखांना उपस्थित रहावे, असे आवाहन आयोगाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

पुणे विभागाची सुनावणी दि. 30 जून रोजी व्ही.व्ही.आय.पी. शासकीय विश्रामगृह, पुणे येथे दु. 2.00 वा. होणार असून सुनावणीस सगर, कडिया, कुलवाडी, टकारी, लिंगायत रड्डी या जाती/जमातींनी त्यांनी उपस्थित रहावे.

अमरावती विभागाची सुनावणी दि. 5 जुलै 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह, अमरावती येथे सकाळी 11 वा. होणार आहे. या सुनावणीस हलवाई, हलबा कोष्टी, अहिर गवळी, गवळी अहीर, अहीर, गुरुडी, गुरुड, गुरड, कापेवार, गु.कापेवार, गुरुड कापेवार, गुरुडा कापेवार, हडगर, केवट समाजातील तागवाले/ तागवाली यांनी उपस्थित रहावे, तसेच तेलंगी ऐवजी तेलगी अशी दुरुस्ती करण्याबाबतही सुनावणी होणार असून संबंधित जाती/जमातींनी या दिवशी वरील वेळी सुनावणीस उपस्थिती रहावे.

नाशिक विभागाची सुनावणी दि. 15 व दि. 16 जुलै, 2022 अशी दोन दिवस होणार आहे. दि. 15 जुलै 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह, नाशिक येथे सकाळी 11वा. होणाऱ्या सुनावणीस काथार / कंठहारवाणी, कंसारा, अत्तार जातीय तत्सम जातः पटवे, पटवेगर, पटोदर, चेवले गवळी दाभोळी, गवळी व लिंगायत गवळी, नावाडी या जाती / जमातींनी उपस्थित रहावे,

तसेच बैरागी जातीच्या संदर्भात शासन निर्णयात दुरुस्तीच्या अनुषंगाने या सुनावणीस उपस्थिती रहावे.

दि. 16 जुलै 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह, नाशिक येथे सकाळी 11 वा. होणाऱ्या सुनावणीस वळंजूवाणी, कुंकारी वळांजूवाणी, वळुंज बळुंज, शेटे, दलाल इ. लाडशाखीय वाणी, लाडवंजारी, रामगडिया सिख, कानडे / कानडी या जाती / जमातींनी उपस्थित रहावे, असे संशोधन अधिकारी, महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग, पुणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

अरे व्वा हा तर खानदेशचा सन्मान : बटरफ्लाय’ला आंतराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट लघू चित्रपट ॲवार्ड, तसेच अन्य तीन ॲवार्ड घोषीत

Next Post

जिल्ह्यात नव्याने बाल न्याय मंडळ व बाल कल्याण समिती गठीत

Next Post
जिल्ह्यात नव्याने बाल न्याय मंडळ व बाल कल्याण समिती गठीत

जिल्ह्यात नव्याने बाल न्याय मंडळ व बाल कल्याण समिती गठीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add