नंदुरबार l प्रतिनिधी
महिला व बाल विकास विभागाच्या सूचनेनूसार बाल न्याय ( मुलांची काळजी व सरंक्षण अधिनियम 2015) अन्वये विधी संघर्षग्रस्त बालक तसेच काळजी व सरंक्षणाची गरज असलेल्या बालकांकरिता कर्तव्य पार पाडण्यासाठी जिल्ह्यात नव्याने बाल न्याय मंडळ व बाल कल्याण समिती गठीत करण्यात आली आहे.
या नवनियुक्त समितीत बाल न्याय मंडळाचे सदस्य म्हणून नितीन सनेर, ज्योती कळवणकर यांची निवड झाली आहे. तर बाल कल्याण समितीचे अध्यक्ष म्हणून ॲड. नीता देसाई तर मीनाक्षी देसले, पुष्पलता ब्राम्हणे, प्रा.डॉ.साहेबराव अहिरे, ॲड. सीमा खत्री यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती जिल्हा माहिला व बाल विकास अधिकारी साईनाथ वंगारी यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.