नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील सी.बी.पेट्रोल पंपामधील गणपती नगराजवळ एकास मारहाण केल्याप्रकरणी बारा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार शहरातील शास्त्री मार्केट येथील समीर निसार पिंजारी हे मोबाईलवरुन मुलीला कॉल करतात अशा संशय घेत साहिल विश्वनाथ सावंत व कुणाल कोळी यांनी समीर पिंजारी यांना सोबत येण्याचे सांगितले.
समीर पिंजारी हे दुचाकीने हे दोघांसोबत सी.बी.पेट्रोल पंपाच्या मागे गणपती नगरच्या मोकळ्या जागेवर गेले. तेथे समीर पिंजारी यांना साहिल विश्वनाथ सावंत, कुणाल कोळी, भावेश चौधरी, नितीन माळी, ऋषीकेश माळी, मयूर येलिस, हितेश मधुकर वाडीले, पवन धनराज सावंत, प्रेम चौधरी, राज राजपूत व मयंक प्रकाश पाटील यांनी यांनी गर्दी करुन हाताबुक्यांनी मारहाण केली.
तसेच शिवीगाळ करीत दमदाटी करीत जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले. याबाबत समीर पिंजारी यांच्या फिर्यादीवरुन उपनगर पोलिस ठाण्यात १२ जणांविरोधात भादंवि कलम १४३, १४७, १४९, ३२३, ५०४, ५०६ व महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३७ (१) (३) चे उल्लंघन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक देविदास सोनवणे करीत आहेत.








