नंदुरबार l प्रतिनिधी
निकषांच्या घोळ निर्माण करून जिल्ह्यातील नुकसानग्रस्त विमाधारक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या लाभांपासून वंचित ठेवले आहे . याबाबत जिल्हाधिकारी तसेच संबंधीत विमा कंपनीशी संपर्क साधूनही शेतकऱ्यांना दाद दिली जात नाही . यामुळे १३ जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी निवेदनाव्दारे दिला आहे .
याबाबत जिल्हाधिकारींना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेतकरी बांधवांच्या हितासाठी केंद्र सरकार द्वारे प्रधानमंत्री पिक विमा योजना कार्यरत आहे . पावसाचा विलंब तसेच मधल्या काळात पावसाचा खंड पाहून अनेक शेतकरी बांधवांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विमे उतरवले होते .
नंतरच्या काळात आपत्तींमुळे अनेक शेतकरी बांधवांचे नुकसान झाले होते . नुकसान विषयक विमा कंपनी च्या संपर्क क्रमांक वर संपर्क साधुन नुकसान विषयी माहिती दिली होती . मात्र कंपनी द्वारा नुकसान पाहनी झाली नाही .
तसेच मदत मिळेल किंवा नाही या विषंयी स्थानिक पातळीवर प्रतिनिधी स्पष्टता करित नाहीत . निवेदन ही शेतकऱ्यांनी दिलेले स्विकारीत नाहीत . कंपनी च्या इमेल वर ही कोणत्याही प्रतिक्रिया देण्यात येत नाही . १५ ऑक्टोबर २०२१ नंतरच्या नुकसानग्रस्त विमाधारक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या लाभ मिळणार आहे किंवा नाही हे स्पष्ट झाले नाही .
शासनाने या विषयावर योग्य कार्यवाही करत तात्काळ शेतकरी बांधवांना विमा योजनेचा लाभ मिळवून द्यावा असे पत्र दिले होते . १५ ऑक्टोबर २०२१ नंतरच्या नुकसान ग्रस्त विमाधारक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ मिळणार आहे .
किंवा नाही महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्वरीत स्पष्ट करावे . विमा कंपनी व्दारे निकषांचा उल्लेख . कुठे करण्यात आला होता ते ही स्पष्ट करावे .
निकषांचा घोळ निर्माण करून , बहुसंख्य शेतकरी बांधवांना लाभापासून वंचित ठेवले जात आहे . दि. ११ जून २०२२ पर्यंत योग्य मदत व स्पष्टता न मिळाल्यास,
दि. १३ जून २०२२ पासून जिल्हा अधिकारी कार्यालय नंदुरबार येथे शेतकरी बांधवांच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल , असा असा इशारा शेतकरी दत्त्तात्रेय खलाने माजी सरपंच काकरदे, धनराज माळी, फारुख कुरेशी, योगेश सोनार, पुरषोत्तम हिरे, दगडु पवार,विजय मराठे व अन्य शेतकरी बांधव या वेळी उपस्थित होते.








