Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

परिवहन कार्यालयात आता सहा फेसलेस सेवा उपलब्ध

team by team
June 10, 2022
in राज्य
0
परिवहन कार्यालयात आता सहा फेसलेस सेवा उपलब्ध

नंदुरबार l प्रतिनिधी
शिकाऊ अनुज्ञप्ती व वितरकामार्फत नोंदणी अशा दोन फेसलेस सेवा परिवहन कार्यालयामार्फत देण्यात येत होत्या. केंद्र शासनाने नागरिकांना 18 प्रकारच्या सेवा आधार क्रमांकाचा वापर करुन फेसलेस पद्धतीने देण्याच्या सूचना केल्या आहेत.

त्यामुळे आता परिवहन कार्यालयात आणखी 6 सेवा फेसलेस पद्धतीने देण्यात येणार असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये दिली आहे.

परिवहन विभागामार्फत नागरिकांना 115 सेवा देण्यात येतात त्यापैकी 84 सेवा ऑनलाईन केल्या आहेत. या सहा नवीन सेवांचा लाभ घेण्याकरीता अर्जदाराकडे आधारकार्ड व त्या आधारकार्डशी मोबाईल नंबर जोडणी असणे आवश्यक असून 18 सेवांचा लाभ घेण्याकरीता

आधारक्रमांकाचा वापर करण्यात येणार असून आधार क्रमांकामधील मोबाईलवर ओटीपी पाठविण्यात येईल. ओटीपीची नोंदणी परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर केल्यास अनुज्ञप्ती नोंदणी प्रमाणपत्र मधील अर्जदाराची माहिती व आधार अभिलेखातील अर्जदाराची माहिती याची खात्री झाल्यानंतरच अर्जदारास पुढे अर्ज करणे शक्य होणार आहे.

यात अर्जदाराचे नाव, पत्ता,जन्मतारीख व मोबाईल क्रमांक याची खातरजमा झाल्यावर दुय्यम नोंदणी प्रमाणपत्रासाठी अर्ज, वाहन चालक अनुज्ञप्तीचे दुय्यमीकरण, ना-हरकत प्रमाणपत्र, वाहन चालक अनुज्ञप्तीवरील पत्ता बदल, नोंदणी प्रमाणपत्र वरील पत्ता बदल,

वाहन चालक अनुज्ञप्तीचे नुतणीकरण या सहा सेवासाठी अर्जदारास परिवहन कार्यालयात येण्याची आवश्यकता असणार नाही. अर्जदारांना नविन अनुज्ञप्ती, नोंदणी प्रमाणपत्र पोस्टाने पाठविण्यात येईल. यासेवामुळे अर्जदाराच्या वेळेची बचत तसेच कागदपत्राची प्रत काढण्याची आवश्कता नसल्याने कागदाची सुध्दा बचत होणार आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

निकषांच्या घोळ निर्माण करून नुकसानग्रस्त विमाधारक शेतकऱ्यांना ठेवले वंचित, १३ जूनपासून बेमुदत धरणे आंदोलनलनाचा इशारा

Next Post

‘दामिनी ’ॲपचा वापर करावा जिल्हा आपत्ती नियंत्रण प्राधिकरणाच्या सूचना

Next Post
‘दामिनी ’ॲपचा वापर करावा जिल्हा आपत्ती नियंत्रण प्राधिकरणाच्या सूचना

‘दामिनी ’ॲपचा वापर करावा जिल्हा आपत्ती नियंत्रण प्राधिकरणाच्या सूचना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add