नंदुरबार ! प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील खापर गावाच्यापुढे दोघांना धमकावत जबरीने ६०० रुपये काढून घेतल्याप्रकरणी संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार , नंदुरबार तालुक्यातील पादर शेरपूरा येथील चालक इंद्रिस इस्माईल पटेल व साक्षीदार हे अंकलेश्वर – बहाणपूर महामार्गाने जात होते . यावेळी खापर गावाच्यापुढे इंद्रिस मक्राणी याने अंकलेश्वर – ब – हाणपूर महामार्गावर जनावरांची वाहतूक करणाऱ्या इंद्रिस पटेल यांच्याकडून पैशांची मागणी केली . मात्र पटेल यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने इंद्रिस मक्राणी याने पटेल व त्यांच्यासोबत सहकाऱ्याला धमकावून जबरदस्तीने दोघांच्या खिशातून प्रत्येकी ३०० रुपये असे ६०० रुपये हिसकावून घेतले . याबाबत इंद्रिस पटेल यांच्या फिर्यादीवरुन अक्कलकुवा पोलिस ठाण्यात संशयिताविरोधात भादंवि कलम ३ ९ २ , ५०६ प्रमाणेगुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक चौधरी करीत आहेत .