नंदुरबार | प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील कोंढावळ नियतक्षेत्रामध्ये जंगलगस्त करत असतांना वनकर्मचारी यांना कहाटुळ गावाजवळील तलावामध्ये ४ ईसम हे संशयीत रित्या कासव पकडतांना दिसुन आले. त्याच्या कडुन ४ कासव जप्त करण्यात येवुन त्यांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वनक्षेत्र शहादा अंतर्गत कोंढावळ नियतक्षेत्रामध्ये जंगलगस्त करत असतांना वनकर्मचारी यांना कहाटुळ गावाजवळील तलावामध्ये ४ ईसम हे संशयीत रित्या कासव पकडतांना दिसुन आले.
असता त्यांच्याकडे चौकशी केली असता सचीनभाई दिपाभाई मलमकवाना , अरुणभाई बाबलभाई मलमकवाना , अजयभाई रामसिंग मलमकवाना , लखाभाई मनोज मलमकवाना रा . सर्व तैयबपुरा जि.खेडा गुजरात यांचा कडे सॉफ्ट शेल टर्टल प्रजातीचे जीवंत ४ कासव आली .
सदर प्रजाती हि वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ चा अनुसुचि ( १ ) मधील असल्याने सदर ४ संशयीत आरोपी यांना अटक करण्यात आली असुन वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चा विविध कलमाअंतर्गत प्रथम रिपोर्ट वनगुन्हा नोंदवण्यात आला सदर कार्यवाही
अक्राणी सहा . वनसंरक्षक ( रोहयो ) एस . डी . साळुंके, वनपरिक्षेत्र अधिकारी शहादा ए.पी. मेढे , डी.बी. जमदाळे , डी.ए.पाटोळे, एस.एम.पाटील, बी.एल. राजपुत , श्री.जे. यु.पवार , श्री . बी . वाय . पिंजारी , श्री.एस.एच. राठोड , श्री.एस.जी.मुकाडे , डी.ए.परदेशी, नईम मिर्झा , संजय वाघ , मानद वन्यजीव रक्षक नंदुरबार सागर निकुंभे तसेच वनक्षेत्र शहादा मधील क्षेत्रीय कर्मचारी यांनी संयुक्तपणे आरोपीना जेरबंद करुन ४ जिवंत कासव हस्तगत करुन यशस्वी कार्यवाही केलेली आहे .
तसेच संशयीत आरोपीना न्यायालय शहादा येथे हजर केले असता न्यायालयाने ५ दिवसांची वनकोठडीची शिक्षा सुनावली आहे . सदर वनगुन्हयांचा अनुषंगाने उपवनसंरक्षक नंदुरबार, वनविभाग शहादा के . बी . भवर, सहा . वनसंरक्षक ( रोहयो ) एस . डी . साळुंके यांचा मार्गदर्शनाखाली ए . पी . मेढे , वनपरिक्षेत्र अधिकारी शहादा ( प्रा . ) पुढील तपास करत आहे .