Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आनंदाची बातमी : जिल्हा निर्मीतीच्या तब्बल २४ वर्षांनंतर या विभागाचे नंदुरबार येथे नवीन कार्यालय सुरु होणार

team by team
May 27, 2022
in कृषी
0
आनंदाची बातमी : जिल्हा निर्मीतीच्या तब्बल २४ वर्षांनंतर या विभागाचे नंदुरबार येथे नवीन कार्यालय सुरु होणार

नंदुरबार | प्रतिनिधी
राज्यस्तर यंत्रणेतील जिल्हा जलसंधारण अधिकारी, धुळे या कार्यालयाचे विभाजन करण्यात येऊन नंदूरबार येथे जिल्हा जलसंधारण अधिकारी कार्यालय नव्याने स्थापन करण्यात येणार आहे.

दरम्यान जिल्हा निर्मीतीच्या २४ वर्षांनंतर नंदुरबार जिल्ह्याला मृद व जलसंधारण विभागाचे नंदुरबार येथे नवीन कार्यालये सुरु होणार आहे.

मृद व जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखाली राज्यस्तर यंत्रणेकडे एकूण २६ जिल्हा जलसंधारण अधिकारी कार्यालये तसेच १२७ उपविभागीय जलसंधारण अधिकारी कार्यालये कार्यरत आहेत.

तर जिल्हा परिषद यंत्रणेकडे एकूण ३१ जिल्हा जलसंधारण अधिकारी कार्यालये तसेच १६८ उपविभागीय जलसंधारण अधिकारी कार्यालये कार्यरत आहेत.

विभागाच्या राज्यस्तर यंत्रणेकडील कामकाजाची व्यापकता व यंत्रणेवरील कामाचा ताण कमी करण्याच्या उद्देशाने राज्यस्तर यंत्रणेकडील जिल्हा कार्यालये आणि उपविभागीय कार्यालये यांची संख्या काही प्रमाणात वाढ केल्यास राज्यस्तर यंत्रणा व जिल्हा परिषद यंत्रणा यांचा समतोल साधला जाऊन मनुष्यबळाचा योग्य वापर होण्यास मदत होणार आहे.

राज्यस्तर यंत्रणेमध्ये रायगड, नंदुरबार, परभणी, हिंगोली, भंडारा अशी पाच नवीन जिल्हा जलसंधारण अधिकारी कार्यालये कार्यान्वित करण्यात येणार आहेत.

राज्यस्तर यंत्रणेतील जिल्हा जलसंधारण अधिकारी, धुळे या कार्यालयाचे विभाजन करण्यात येऊन नंदूरबार येथे जिल्हा जलसंधारण अधिकारी कार्यालय नव्याने स्थापन करण्यात येणार आहे अशी माहिती मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी दिली.

या नविन रचनेमुळे जलसंधारण विभागाचे कामकाज गतीमान होणार आहे. संबंधित लोकप्रतिनिधींची अनेक वर्षांची मागणी पूर्ण होत आहे.दरम्यान जिल्हा निर्मीतीच्या २४ वर्षांनंतर नंदुरबार जिल्ह्याला मृद व जलसंधारण विभागाचे नंदुरबार येथे नवीन कार्यालये सुरु होणार आहे त्यामळे जलसिंचन प्रकल्पांना चालना मिळुन नागरीकांना सोयीचे होणार आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

गुजरात मधील नागरीकांकडुन चार कासव जप्त,चौघांना पाच दिवसांची वनकोठडीची

Next Post

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांना पोस्टाव्दारे पाठविल्या बांगड्या व कुंकूचा आहेर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

November 1, 2026
खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

November 1, 2026
सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

November 1, 2026
भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर  गोदाघाट येथे सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभाचे पूजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर गोदाघाट येथे सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभाचे पूजन

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add