नंदुरबार | प्रतिनिधी
शहादा खेतीया रस्त्यावरील दरा फाटयाच्या पुढे मोटरसायकलीला ठोस मारून हॉकी स्टीकने मारहाण करीत एकाकडून ६ लाख ६२५ रूपये बळजबरीने लंपास केल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी अज्ञात तिघांविरूध्द शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खेतीया येथील रहिवासी दिपक राधेश्याम राजपूत हे कलेक्शन करून जात असतांना.
शहादा खेतीया रस्त्यावरील दरा फाटयाच्यापुढे २५ मे रोजी सायंकाळी ४.४५ वाजेच्या सुमारास त्यांच्या मोटरसायकलला मागून आलेल्या मोटरसायकलने धडक दिले. यावेळी त्या मोटरसायकलीवरील तीन अनोळखी इसमांनी हॉकीस्टीकचा धाक धाकवून दिपक राजपूत व त्यांच्या सोबत असलेल्या एकाला हॉकीस्टीकने मारहाण करन दुखापत केली.
तसेच रेग्झीनचा पिशवीमध्ये असलेले ६ लाख ६२५ रूपयांसह पिशवी लंपास करत मोटरसायकलीने पळून गेले. याप्रकरणी दिपक राधेश्याम राजपूत रा.खेतीया (ता.पानसेमल) यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३९४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोसई जितेंद्र महाजन करीत आहेत.