शहादा l प्रतिनिधी
पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाचे वरिष्ठ महाविद्यालय शहादा येथील राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या स्वयंसेवकांनी आझादी का अमृतमहोत्सव व माजी वसुंधरा अभियान अंतर्गत सीड बॉल उपक्रम राबविला.
याअंतर्गत मान्सून पूर्व तयारी म्हणून माती, क्ले आणि झाडांच्या बिया असे एकत्र करून त्याचे 75च्या पटीने म्हणजे 150, 225, 300 इत्यादीप्रमाणे सीड बॉल तयार करण्यात आले.
या सीड बॉल मध्ये प्रत्येकी दोन बिया सीताफळ, गुलमोहोर, कडुलिंब, जांभूळ एकत्र करून त्याचे बॉल बनविले. जुन महिन्यात पहिला पाऊस पडल्यानंतर स्वयंसेवक सदर सीड बॉल हे दत्तक गाव, डोंगराळ भागात, रस्त्यालगत टाकणे
तसेच शिक्षक, शेजारी, मित्र आदि सर्वांना देण्यात येणार आहेत.
सोबतच माझी वसुंधरा अंतर्गत वृक्ष लागवडीचे काम सुद्धा नियोजनात आहे.त्यांच्या या उपक्रमाचे, मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्रा.मकरंद पाटील, प्राचार्य डॉ. आर. एस.पाटील, उपप्राचार्य डॉ. एम. के.पटेल, उपप्राचार्य डॉ. एस. डी. सिंदखेडकर यांनी अभिनंदन केले.
सदर उपक्रमास रा.से.योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.राजेंद्र पाटील, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. वजीह अशहर, प्रा.सौ.वर्षा चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.