नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील तलावडी येथे लग्नात आहेर केल्याच्या रागातून आई व मुलास मारहाण केल्याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा तालुक्यातील तलावडी येथील आकाश सुधीर पावरा हे लग्नात आहेर करण्यासाठी गेले. याचा राग आल्याने हिंमत ब्रिजलाल पावरा याने आकाश पावरा यांना फायटरने डोक्यावर मारुन दुखापत केली.
भावसार सुभाष पावरा यानेही हातातील कड्याने डोक्यावर मारहाण केली. विनोद दारासिंग पावरा व कल्याणसिंग भिमसिंग पावरा, प्रेमराज ब्रिजलाल पावरा, विलास भिकसिंग पावरा यांनीही हाताबुक्यांनी मारहाण केली.
यावेळी आकाश पावरा यांना सोडविण्यासाठी त्यांची आई छायाबाई आली असता त्यांनाही ब्रिजलाल जयसिंग पावरा याने काठीने डोक्यावर मारुन दुखापत केली.
तसेच गावातील सुधीर मानसिंग पावरा, शिवदास पावरा व मोतीलाल सायसिंग पावरा हे सदर भांडण सोडविण्यासाठी गेले असता त्यांनाही शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली.
तसेच गैरकायद्याची मंडळी जमवून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केले. याबाबत दीपक मोतीलाल पावरा यांच्या फिर्यादीवरुन म्हसावद पोलिस ठाण्यात सात जणाविरोधात भादंवि कलम १४३, १४७, १४९, ३२४, ३२३, ५०४, ५०६ सह महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७ (१) (३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गुलाबसिंग पावरा करीत आहेत.